नवी दिल्लीः देशात सध्या करोनाचे संकट अद्याप कायम आहे. करोनाचे संकट दूर करण्यासाठी टेक जगतातील अनेक कंपन्यांनी पुढे येऊन आर्थिक मदत केली आहे. देश विदेशातून कंपन्या भारताला मदत करीत आहेत. देशाची दिग्गज नेटवर्क प्रोव्हाइडर कंपनी भारती एअरटेल आपल्या ग्राहकांना फायदा पोहोचवण्यासाठी एकापेक्षा एक जबरदस्त प्लान ऑफर करीत आहे. कंपनीने नुकतेच लो इन्कम असणाऱ्या ग्राहकांसाठी या महामारीत आपल्या नेटवर्कशी जोडले राहावे यासाठी एका स्पेशल फायद्याची घोषणा केली आहे. वाचाः एअरटेल आपल्या ग्राहकांसाठी एकवेळ फायदा पोहोचवण्यासाठी ५.५ कोटीहून जास्त लो-इन्कमच्या ग्राहकांना ४९ रुपयांचा रिचार्ज फ्री देत आहे. एअरटेलचा ४९ रुपयांचा रिचार्ज प्लानमध्ये युजर्संना १०० एमबी डेटा मिळतो. व्हाइस कॉलिंगसाठी ३८ रुपयांचा टॉकटाइम मिळतो. या प्लानमध्ये २८ दिवसांची वैधता मिळते. आपल्या या योजनाद्वारे कंपनी आपल्या ५.५ कोटीहून जास्त ग्राहकांना मजबूत बनवणार आहे. यात जास्तीत जास्त ग्राहक हे ग्रामीण भागातील आहे. वाचाः सध्या करोनामुळे कठीण काळ आहे. या काळात ग्राहकांना आपल्या कुटुंबासोबत आणि मित्रपरिवारांसोबत जोडलेले राहावे यासाठी कंपनीने हा निर्णय घेतला आहे. कंपनी आपल्या प्रीपेड ग्राहकांना ७९ रुपयांच्या रिचार्ज मध्ये डबल फायदे देत आहे. ४५.८ कोटीहून जास्त ग्राहकासोबत कंपनी साउथ आशिया आणि आफ्रिकाचेय १८ देशात काम करते. एअरटेलच्या ७९ रुपयांच्या प्लानमध्ये २०० एमबी डेटा मिळतो. २८ दिवसांची वैधता मिळते. यात व्हॉइस कॉलिंगसाठी ३८ रुपयांचा टॉकटाइम मिळतो. वाचाः वाचा : वाचाः वाचा :
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3tMD2hK