नवी दिल्लीः टेलिकॉम कंपन्या नेहमी आपल्या ग्राहकांसाठी नवीन ऑफर्स आणत आहेत. Reliance Jio, Airtel आणि Vodafone Idea (Vi)मध्ये जोरदार स्पर्धा लागली आहे. स्वस्त रिचार्ज प्लान, फ्री डेटा ऑफर आणि फ्री स्ट्रिमिंग अॅप्स सारखे प्लान घेऊन येत आहे. आज आम्ही तुम्हाला एअरटेलच्या अशा एका ऑफर संबंधी माहिती देत आहोत. ज्यात फ्री डेटाचा फायदा मिळू शकतो. एअरटेल आपल्या ग्राहकांना निवडक प्रीपेड प्लान रिचार्ज केल्यानंतर अतिरिक्त डेटा ऑफर करते. जाणून घ्या Airtel Free Data Offer संबंधी. वाचाः एअरटेल ग्राहकांना रिचार्ज केल्यानंतर मिळणारा फ्री डेटा कूपन म्हणून मिळतो. हा डेटा डायरेक्ट एअरटेल युजर्संच्या अकाउंटमध्ये क्रेडिट होतो. फ्री एअरटेल डेटा मिळवण्यासाठी ग्राहकांना कमीत कमी २१९ रुपयांचा अनलिमिटे कॉम्बो प्लानला रिचार्ज करावे लागणार आहे. याशिवाय, कंपनीच्या ३९९ रुपये आणि ५९८ रुपयांच्या प्लानला रिचार्ज केल्यावर ६ जीबी पर्यंत फ्री डेटा मिळतो. वाचाः २१९ रुपयांच्या एअरटेल प्लानची वैधता २८ दिवसांची आहे. या प्लानला रिचार्ज केल्यानंतर अतिरिक्त २ जीबी ऑफर केला जातो. ३९९ रुपयांच्या प्लानध्ये ग्राहकांना कंपनी ४ जीबी डेटा फ्री देते. या प्लानची वैधता ५६ दिवसांची आहे. तर ५९८ रुपयांच्या प्लानला रिचार्ज केल्यानंतर ६ जीबी अतिरिक्त डेटा मिळू शकतो. या प्लानची वैधता ८४ दिवसांची आहे. एअरटेलच्या या तिन्ही प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि डेली डेटा सोबत येते. तिन्ही प्लानमध्ये रोज १०० एसएमएसची सुविधा मिळते. २१९ रुपयांच्या प्लानमध्ये रोज १ जीबी डेटा तर ३९९ रुपये आणि ५९८ रुपयांच्या प्लानमध्ये रोज १.५ जीबी डेटा दिला जातो. वाचाः फ्री डेटा मिळवण्यासाठी अटी काय आहेत जर तुम्ही एअरटेल युजर्स आहात आणि तुम्हाला फ्री डेटाचा फायदा घ्यायचा असेल तर तुम्हाला वरून रिचार्ज करावे लागेल. एअरटेलचे हे अधिकृत अॅप आहे. जर तुम्ही हे अॅप फोनमध्ये डाउनलोड केले नसेल तर तुम्हाला ते गुगल प्ले स्टोरवरू डाउनलोड करावे लागेल. एअरटेल रिचार्ज नंतर कंपनी एसएमएस द्वारे ग्राहकांना फ्री डेटाची माहिती पाठवते. एअरेटल थँक्स अॅपवरून My coupons टॅबमध्ये जाऊन तुम्ही फ्री डेटा कूपनला रिडिम करू शकता. या सेक्शनमध्ये तुम्ही कूपनची एक्सपायरी डेट सुद्धा चेक करू शकता. वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3fAjGbN