Full Width(True/False)

फेसबुकवर हॅकर्सचा उच्छाद; वकील, डॉक्टर, पोलिसांचे अकाउंट हॅक होण्याचे प्रमाण वाढले

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई फेसबुक वापरणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे पाहून, सायबर भामटेही यावर सक्रिय झाले आहेत. अनेकांचे फेसबुक प्रोफाइल हॅक करून त्यांच्या फ्रेंडलिस्टमध्ये असलेल्या मित्र-मैत्रिणींकडून पैसे मागण्याचे प्रकार वाढले आहेत. विशेष म्हणजे वकील, डॉक्टर, पोलिस यांचीही बनावट प्रोफाइल तयार करून उपचारांच्या नावाखाली पैशांची मागणी केली जात आहे. सायबर पोलिसांकडे फेसबुक प्रोफाइल हॅक करण्याच्या तक्रारीही वाढल्या आहेत. वाचाः मुंबई पोलिस दलातील एका आयपीएस अधिकाऱ्याचे फेसबुक अकाउंट हॅक करून त्यांच्या मित्रांच्या यादीमधील अनेक मित्रांकडे पैशांची मागणी करण्यात आली. ही रक्कम ४० ते ५० हजार रुपयांच्या घरात असल्याने मित्रांना संशय आला आणि त्यांनी या अधिकाऱ्याशी संपर्क केला असता, पैशांची मागणी केली नसल्याचे समोर आले. असेच प्रकार मुंबई पोलिस दलातील उपनिरीक्षकापासून ते सहायक आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांपर्यंत अनेकांच्या बाबतीत करोना काळात घडले आहेत. फेसबुकवर किंवा अन्य सोशल मीडियावरून ओळख लपवून पैशांची मागणी करणाऱ्यांपासून सावध राहण्याचे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे. वाचाः बनावट प्रोफाइल बनल्यास - तुमचे बनावट फेसबुक प्रोफाइल बनवले गेले असल्यास स्वतःच्या फेसबुक अकाउंटवर बनावट प्रोफाइल शोधा अथवा मित्रांना लिंक पाठविण्यास सांगा. - त्या प्रोफाइलवर जाऊन उजव्या बाजूला तीन टिंब (...) असतात त्यावर क्लिक करा. - 'फाइंड सपोर्ट ऑर रिपोर्ट प्रोफाइल'या पर्यायावर क्लिक करा. -त्यानंतर 'प्रीटेंडिंग टु बी समवन' हा पर्याय निवडा. - त्यानंतरमी, अ फ्रेन्ड आणि सेलिब्रिटीहे पर्याय दिसतील. - आपलेप्रोफाइल खोटे असल्यास 'मी'(Me)या पर्यायावर क्लिक करा. - काही वेळेतच खोटे अकाउंट बंद होईल. - त्यानंतर आपल्या मूळ प्रोफाइलवर बनावट अकाउंटची माहिती द्या. प्रोफाइल सुरक्षित ठेवण्यासाठी... - स्वतःची फ्रेंडलिस्ट अनोळखी व्यक्तीला दिसू नये, यासाठी 'हू कॅन सी युवर फ्रेन्डलिस्ट'मध्ये 'ओनली मी' पर्याय निवडा. - फोटो, व्हिडीओ कुणीही डाऊनलोड करू नये, यासाठी 'लॉक युवर प्रोफाइल'वर क्लिक करा. - अनोळखी व्यक्तीने फ्रेंड रिक्वेस्ट पाठवू नये यासाठी 'हू कॅन सेंड रिक्वेस्ट' या पर्यायामध्ये जाऊन'फ्रेन्ड्स ऑफ फ्रेन्ड्स'हा पर्याय निवडावा. - फेसबुक अकाउंट सुरक्षित ठेवण्यासाठी 'सेटिंग्ज'मध्ये जाऊन 'टू फॅक्टर ऑथेंटीकेशन'हा पर्याय निवडावा. - इ मेल आयडी दिसू नये, यासाठी 'हू कॅन लूक इमेल अॅड्रेस'या पर्यायावर जाऊन 'ओनली मी' हा पर्याय निवडावा. - मोबाइल क्रमांक कोणाला दिसू नये म्हणून 'हू कॅन लूक फोन नंबर'या पर्यायामध्येही'ओनली मी'हा पर्याय निवडावा.


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3p8BvlA