Full Width(True/False)

स्नॅपड्रॅगन ८८८ आणि १६जीबी रॅमने परिपूर्ण Asus ZenFone ८ आणि Asus ZenFone ८ फ्लिप लाँच ,पाहा फीचर्स

नवी दिल्ली. स्मार्टफोन निर्माता असूसने झेनफोन मालिका जागतिक स्तरावर लाँच केली असून याअंतर्गत आणि Asus ZenFone 8 फ्लिप असे दोन स्मार्टफोन सादर करण्यात आले आहेत. झेनफोन ८ फ्लिपचा लूक गेल्या वर्षी लॉन्च झालेल्या फोन प्रमाणेच आहे.तर, वन हॅन्ड फ्रेंडली बनावे म्हणून झेनफोन ८ ला पुन्हा डिझाइन केले गेले आहे. वाचा : किंमतीबद्दल बोलायचे झाल्यास झेनफोन ८ ची किं मत ५९९ युरो म्हणजेच सुमारे ५३,२९३ रुपये आहे. त्याचबरोबर झेनफोन ८ फ्लिपची किंमत ७९९ युरो म्हणजेच सुमारे ७१,००० रुपये आहे. झेनफोन ८ केवळ उत्तर अमेरिकेत उपलब्ध करुन देण्यात येईल, असे कंपनीचे म्हणणे आहे. याची किंमत अमेरिकेत उपलब्ध करुन देण्यात येईल. भारतीय बाजारात हे कधी लाँच होतील याबद्दल अद्याप माहिती नाही. जाणून घ्या या दोन्ही फोनची वैशिष्ट्ये. Asus ZenFone ८ आणि Zenfone ८ फ्लिपची वैशिष्ट्ये: दोन्ही फोनमध्ये स्नॅपड्रॅगन ८८८ प्रोसेसर आहे. झेनफोन ८ मध्ये ५.९ इंचाचा १०८० पिक्सल रेझोल्यूशन ओएलईडी आहे ज्याचा रि फ्रेश दर १२० हर्ट्ज आहे. हे १६ जीबी रॅम पर्यंत आणि २५६ जीबी पर्यंतच्या संचयनासह उपलब्ध केले जाईल. हे आयपी ६८ वॉटरप्रूफिंग रेटिंगसह आह Asus ZenFone ८ आणि Zenfone ८ फ्लिप ५ जी ला सपोर्ट करतात. परंतु जेव्हा झेनफोन ८ यूएस मार्केटमध्ये प्रवेश करेल तेव्हा ते फक्त एटी अँड टी आणि टी-मोबाइलच्या एलटीई आणि सब -६ जीएचझेड ५ जी नेटवर्कवर काम करेल. झेनफोन ८ मध्ये दोन बॅक कॅमेरे आहेत. त्याचे प्राथमिक सेन्सर ६४ मेगापिक्सेल आहे, जे ओआयएससह येते. दुसरा सेन्सर १२-मेगापिक्सलचा अल्ट्राव्हायोलेट लेन्स आहे. त्याच वेळी सेल्फीसाठी फोनमध्ये १२-मेगापिक्सलचा होल-पंच कॅमेरा आहे. फोनमध्ये ४००० एमएएच बॅटरी आहे. हे ३० डब्ल्यू वायर्ड चार्जिंगला सपोर्ट करते. हे वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करत नाही.. त्यामध्ये ड्युअल स्टीरिओ स्पीकर्स देण्यात आले आहेत. तसेच ३.५ एमएम मिमीचा हेडफोन जॅकसुद्धा देण्यात आला आहे. झेनफोन ८ फ्लिप : यात ६.६७ इंचचा पिक्सेल रिझोल्यूशन ओएलईडी आहे ९० हर्ट्झचा रीफ्रेश दर. हे ८ जीबी रॅम पर्यंत आणि २५६ जीबी पर्यंतच्या संचयनासह उपलब्ध केले जाईल. त्याचे आयपी रेटिंग नाही. फोनमध्ये ५००० एमएएच बॅटरी आहे. हे ३० डब्ल्यू वायर्ड चार्जिंगला सपोर्ट करते. झेनफोन ८ फ्लिपची विशेषता म्हणजे त्याचा फ्लिप आउट कॅमेरा. यात ट्रिपल रियर कॅमेरे आहेत. त्याचे प्राथमिक सेन्सर ६४ मेगापिक्सेल आहे. दुसरा सेन्सर १२-मेगापिक्सलचा अल्ट्राव्हायोलेट लेन्स आहे. तिसरा सेन्सर ८ मेगापिक्सलचा टेलिफोटो लेन्स आहे. फोनचा मागील कॅमेरा स्वतःच फ्लिप होतो आणि सेल्फी कॅमेर्‍यामध्ये रुपांतरीत होतो. या मॉड्यूलला भक्कम मोटार देण्यात आली असून ती तब्बल ३,००,००० वेळा फ्लिप होऊ शकते असा कंपनीचा दावा आहे. वाचा : वाचा : वाचा :


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3o9epL2