Full Width(True/False)

अनुष्का शर्माचा भाऊ आहे अभिनेत्री तृप्ती डिमरीच्या प्रेमात?

मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री मागच्या बऱ्याच काळापासून कोणत्याही चित्रपटात दिसलेली नाही. पण सोशल मीडियावर मात्र ती बरीच सक्रिय असते. अनेकदा तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे ती चर्चेतही असते. अनुष्कानं तिच्या भावासोबत मिळून चित्रपट निर्मितीला सुरुवात केली आहे. निर्मिती क्षेत्रात असलेला अनुष्काचा भाऊ कर्णेश लाइम लाइट पासून नेहमीच दूर असतो. मात्र सध्या तो सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. अभिनेत्री तृप्ती डिमरीसोबतची त्याची मैत्री सध्या सगळीकडे चर्चेचा विषय ठरत आहे. अनुष्का शर्माचा भाऊ आणि अभिनेत्री यांची मैत्री आता सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. तृप्तीनं कर्णेशच्या होम प्रॉडक्शनचा चित्रपट बुलबुलमध्ये मुख्य भूमिका साकारली होती. या दोघांची ओळखही याच चित्रपटाच्या सेटवर झाली होती. नंतर त्या दोघांमध्ये चांगली मैत्री झाली. याची प्रचिती त्यांच्या सोशल मीडिया पोस्टवरून येते. तृप्तीनं तिच्या इन्स्टाग्रामवर कर्णेशसोबतचे बरेच फोटो शेअर केले आहेत. त्यामुळे या दोघांमध्ये मैत्री की त्यापेक्षाही जास्त काही अशी चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. दरम्यान तृप्ती आणि कर्णेश या दोघांना याबाबत विचारलं असता त्यांनी याविषयी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. पण काही दिवसांपूर्वीच अनुष्का शर्मानं तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर अपलोड केलेल्या फोटोनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. ज्यात अनुष्कासोबत कर्णेश आणि तृप्ती दोघंही दिसत होते. या फोटोच्या कॅप्शनमध्ये अनुष्कानं 'तुमची आठवण येतेय' असं लिहिलं होतं. ज्यावरून अनुष्का आणि तृप्तीमध्येही चांगलं बॉन्डिंग असल्याचं बोललं जात आहे. मूळची डेहरादूनची असलेल्या तृप्ती डिमरीनं २०१७ मध्ये श्रेयस तळपदेच्या 'पोस्टर बॉइज' या चित्रपटातून बॉलिवूड पदार्पण केलं होतं. या चित्रपटात सनी देओल आणि बॉबी देओल यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका होत्या. त्यानंतर वर्षभरानंतर तृप्ती साजिद अली यांच्या 'लैला मजनू' या चित्रपटात अविनाश तिवारीसोबत रोमान्स करताना दिसली होती. आगामी काळात तृप्तीकडे बरेच प्रोजेक्ट आहेत. ती करण जोहरच्या एका चित्रपटात अभिनेता इशान खट्टरसोबत दिसण्याची शक्यता आहे. याशिवाय तिनं काही काळापूर्वीच 'अॅनिमल' हा चित्रपट साइन केला आहे. ज्यात अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री परिणिती चोप्रा मुख्य भूमिकेत आहेत. एवढंच नाही तर तृप्ती अनुष्का शर्माच्या होम प्रोडक्शनचा चित्रपट 'काला'मध्येही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटातून दिवंगत अभिनेता इरफान खान यांचा मुलगा बाबिल खान बॉलिवूड पदार्पण करत आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3wAsBQ1