Full Width(True/False)

Window AC च्या किंमतीत खरेदी करा Split AC, मिळत आहे ५०% सूट

नवी दिल्ली : उन्हाळ्यात गर्मी पासून सुटका मिळावी यासाठी एसी खरेदी करण्याकडे अनेकांचा कल असतो. मात्र, बजेटमुळे अनेकजण हा विचार सोडून देतात. तम्ही देखील खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही चांगली संधी आहे. कारण, उन्हाळा सुरु झाल्यानंतर AC च्या किंमती देखील वाढतील. अशात जर तुम्ही AC खरेदी करण्याचा विचार करत असाल तर काही चांगले पर्याय आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. यावर तुम्ही २८,५०० रुपयांपर्यंत बचत देखील करू शकता. वाचाः 1 Ton 3 Star Split Inverter AC: याची किंमत ४२,२०० रुपये आहे. या एसीला २८ टक्के डिस्काउंटसह २९,९०० रुपयात खरेदी करता येईल. हा एक टनचा ३ स्टार इन्वहर्टर एसी आहे. यासोबत एक वर्षाची कंप्रिहेंसिव्ह वॉरंटी, ४ वर्षांची पीसीबी आणि ९ वर्षांची कंप्रेसर वॉरंटी देण्यात आली आहे. या एसीला नो कॉस्ट आणि स्टँडर्ड ईएमआयसोबत खरेदी करता येईल. यात स्लीप मोड आणि ऑटो रिस्टार्ट फीचर देण्यात आले आहेत. Haier 1.25 Ton 3 Star Split Inverter AC: याची किंमत ५७ हजार रुपये असून ५० टक्के सूटसह एसीला २८,४९० रुपयात खरेदी करता येईल. हा १.२५ टनचा ३ स्टार इन्वर्टर एसी आहे. यावर १ वर्षाची प्रोडक्ट वारंटी आणि 2 वर्षांची कंप्रेसर वॉरंटी मिळेल. यावर नो कॉस्ट आणि स्टँडर्ड ईएमआयचा पर्याय मिळेल. यात देखील स्लीप मोड आणि ऑटो रिस्टार्ट फीचर देण्यात आले आहे. वाचाः 1 Ton 3 Star Split Inverter AC: सॅमसंगच्या या एसीची किंमत ४२,९९० रुपये आहे. ३४ टक्के डिस्काउंटसह एसीला २७,९९० रुपयात खरेदी करता येईल. हा १ टनचा ३ स्टार इन्वर्टर एसी आहे. यावर १ वर्षांची कंप्रिहेंसिव्ह वॉरंटी आणि १० वर्षांची कंप्रेसर वॉरंटी मिळत आहे. यात स्लीप मोड आणि ऑटो रिस्टार्टचे फीचर मिळते. एसीला नो कॉस्ट आणि स्टँडर्ड ईएमआयसोबत खरेदी करता येईल. ONIDA 1.5 Ton 3 Star Split Dual Inverter AC: याची किंमत ५३,४९० रुपये आहे. या एसीला ४६ टक्के डिस्काउंटस २८,४९० रुपयात खरेदी करता येईल. हा १.५ टनचा ३ स्टार इन्वर्टर एसी आहे. यावर १ वर्षाची प्रोडक्ट वॉरंटी आणि ५ वर्षांची कंप्रेसर वॉरंटी मिळत आहे. एसीला नो कॉस्ट आणि स्टँडर्ड ईएमआयसोबत खरेदी करता येईल. यात स्लीप मोड आणि ऑटो रिस्टार्ट फीचर देण्यात आले आहे. Whirlpool 1.5 Ton 3 Star Split Inverter AC: याची मूळ किंमत ५३,४२० रुपये असून, ४३ टक्के डिस्काउंटसह एसीला २९,९९० रुपयात खरेदी करता येईल. हा १.५ टनचा ३ स्टार इन्वर्टर एसी आहे. यावर १ वर्षांची प्रोडक्ट वॉरंटी, १ वर्षांची कंडेसर आणि १० वर्षांची कंप्रेसर वॉरंटी देण्यात आली आहे. यात स्लीप नोड आणि ऑटो रिस्टार्ट फीचर देण्यात आले आहे. एसीला नो कॉस्ट आणि स्टँडर्ड ईएमआयसोबत खरेदी करता येईल. वाचाः वाचा : वाचा


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3ur4stG