मुंबई : छोट्या पडद्यावर सर्वाधिक लोकप्रिय असलेला '' या कार्यक्रमाचे ११ वे पर्व लवकरच प्रसारित केले जाणार आहे. या कार्यक्रमाची सर्व टीम आणि कलाकार केपटाउनमध्ये पोहोचली आहेत. अद्याप चित्रीकरणाला सुरुवात झालेली नसल्याने कलाकार मंडळी केपटाउनमध्ये मजा करताना दिसत आहेत. अनेक फोटो आणि व्हिडीओजही त्यांनी शेअर करत आहेत. अर्जुन बिजलानीने नुकताच एक व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओमध्ये अर्जुन श्वेता तिवारीला तिच्या फिटनेसचे गुपित विचारताना दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या खूपच व्हायरल झाला आहे. सोशल मीडियावर या कार्यक्रमातील कलाकार त्यांचे ग्लॅमरस अंदाजातील फोटो शेअर करत असून तो सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाले आहेत. आणि यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये अभिनव शुक्ला ही दिसत आहे. अर्जुन बिजलानी श्वेताला विचारतोय, तू कोणते च्यवनप्राश खातेस ? यावर उत्तर देताना श्वेता तिवारी म्हणते, ‘हार्ड वर्क’!. त्यानंतर ती अर्जुनला बॉसी अंदाजात तिचे अॅब्ज दाखवते. यावर अर्जुन, अनुष्का सेनला म्हणतो शिक जरा हिच्याकडून काही. त्यावर अनुष्काही हसू लागते. श्वेता आणि अर्जुनचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये अर्जुन पूल साईड बसून श्वेता तिवारीचा व्हिडीओ शूट करताना दिसतो. या व्हिडीओमध्ये अभिनव शुक्ला अनुष्का सेनचे फोटो काढताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून श्वेता तिवारीच्या ट्रांसफॉर्मेशन जर्नीची बरीच चर्चा आहे. श्वेताने तिचं वजनही बरंच कमी केलंय. तिने तिच्या डाएटवर लक्ष दिलंय आणि सोबतच वर्कआऊटही करतेय. सोशल मीडियावरही तिने अनेकदा तिच्या वेट लॉस जर्नी बाबत गोष्टी शेअर केल्या आहेत. एका पोस्टमध्ये तिने लिहिलं की, “वजन कमी करणं हे काही सोप्पं काम नाही, खूप अवघड असतं हे. यासाठी तुम्हाला प्रचंड निष्ठेची गरज असते. सेल्फ कंट्रोलही यात महत्त्वाचा असतो.” श्वेता तिवारी तिच्या पर्सनल लाइफमुळे देखील चर्चेत आली आहे. श्वेता आणि तिचा पती अभिनव कोहली या दोघांच्या नात्यांमधले संबंध बिघडले आहेत. दोघांनी एकमेकांबद्दल असलेला द्वेष सोशल मीडियावर व्यक्त करत आहेत. इतकंच नाही तर एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप ही करत आहेत.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3tKaVzJ