मुंबई: बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माता मागच्या काही काळापासून हृदयाशी संबंधीत समस्येचा सामना करत होता. मागच्या काही काळापासून अनुरागच्या छातीत दुखत होतं. ज्यामुळे त्याच्यावर नुकतीच शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. अनुरागला मागच्या काही काळापासून होत असलेल्या त्रासामुळे त्याच्यावर एंजिओप्लास्टी करण्यात आली. याचं कारण हृदयात ब्लॉकेज असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. त्यामुळे त्याच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली. आता त्याची प्रकृती स्थीर असून डॉक्टरांनी आराम करण्याचा सल्ला दिला आहे. 'ब्लॅक फ्रायडे', 'गँग्स ऑफ वासेपूर' सारखे सुपरहिट चित्रपट देणारा निर्माता आणि दिग्दर्शक ४८ वर्षांचा आहे. त्याच्या प्रवक्त्यानं अनुरागवर शस्त्रक्रिया झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. 'अनुरागवर शस्त्रक्रिया झाली असून त्यानंतर त्याच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाली आहे. मात्र डॉक्टरांनी त्याला काही दिवस आराम करण्याचा सल्ला दिला आहे.' अशी माहिती अनुरागच्या प्रवक्त्यानं दिली आहे. दरम्यान अनुरागनं काही काळापूर्वीच 'दोबारा' या चित्रपटाचं शूटिंग पूर्ण केलं असून तो घरीच या चित्रपटाच्या पोस्ट प्रोडक्शनचं काम करत होता. 'मिड डे'नं प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार 'मागच्या आठवड्यात अनुराग कश्यपच्या छातीत दुखायला सुरुवात झाली होती. ज्यामुळे त्यानं स्ववतःचं चेकअप करून घेतलं. एंजिओग्राफी केल्यानंतर डॉक्टरांनी त्याचा हृदयात ब्लॉकेज असल्याचं निदान करत त्याला तत्काळ शस्त्रक्रियेची गरज असल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर अनुरागला रुग्णालयात भरती करण्यात आलं आणि त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार २ आठवड्यांच्या विश्रांतीनंतर तो पुन्हा कामाला सुरुवात करू शकतो. काही दिवसांपूर्वीच अनुराग कश्यपची एक्स वाइफ आरती बजाजच्या आईचं निधन झालं. अनुरागनं सोशल मीडिया पोस्टमधून याची माहिती दिली होती. या काठीण काळात त्याची साथ दिलेल्या सर्वांचे त्याने आभार मानले होते.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3hWYsGH