नवी दिल्ली : च्या ब्रँडने लोकप्रिय चे नवीन व्हेरिएंट लाँच केले आहे. आधीच्या मॉडेलच्या तुलनेत यात वेगळ्या प्रोसेसरचा पर्याय देण्यात आला आहे. रेडमीने काही महिन्यांपूर्वी Redmibook Pro ला Intel 11th जनरेशन कोर स्टँडर्ड प्रोसेससोबत लाँच केले होते. आता रेडमीबुक प्रोचे लाँच केला आहे. हा १४ आणि १५.६ इंच डिस्प्लेमध्ये येतो. रेडमी बुक प्रोचे हे मॉडेल्स AMD Ryzen 5000 सीरिज प्रोसेसरसोबत येतात, जे Zen 3 आर्किटेक्चर ने सुसज्ज आहे. कंपनीने नवीन लॅपटॉपमध्ये १६ जीबी रॅम आणि ५१२ जीबी प्रोसेसर पर्याय दिला आहे. सोबतच यात अनेक दमदार फीचर्स देखील मिळतात. वाचाः किंमत आणि व्हेंरिएंट लॅपटॉपच्या एएमडी राइजन एडिशनला सध्या चीनमध्ये लाँच करण्यात आले आहे. लवकरच भारतासह इतर देशात देखील लाँच केले जाईल. च्या किंमतीबद्दल सांगायचे तर RedmiBook Pro 15च्या AMD Ryzen 5 5600H मोबाइल प्रोसेसर पर्यायामध्ये १६ जीबी रॅम आणि ५१२ जीबी हार्ड डिस्क व्हेरिएंटची किंमत ४७९९ युआन (जवळपास ५४,६४२ रुपये) आहे. तर AMD Ryzen 7 5800H प्रोसेसर पर्यायात १६ जीबी रॅम आणि ५१२ जीबी हार्ड डिस्क व्हेरिएंची किंमत ५२९९ युआन (जवळपास ६०,३२६ रुपये) आहे. RedmiBook Pro 14 च्या AMD Ryzen 5 5500U मोबाइल प्रोसेसर ऑप्शनमध्ये १६ जीबी रॅम आणि ५१२ जीबी हार्ड डिस्क व्हेरिएंटची किंमत ४२९९ युआन (जवळपास ४८,९७४ रुपये) आहे. तर MD Ryzen 7 5700U मोबाइल प्रोसेसर ऑप्शनमध्ये १६ जीबी रॅम आणि ५१२ जीबी हार्ड डिस्क व्हेरिएंटची किंमत ४६९९ युआन (जवळपास ५३,४८३ रुपये) आहे. वाचाः RedmiBook Pro Ryzen Edition Laptop ची वैशिष्ट्ये रेडमीबुक प्रो च्या राइजन एडिशन लॅपटॉपच्या वैशिष्ट्यांबद्दल सांगायचे तर मेटल बॉडीच्या या लॅपटॉपमध्ये एव्हिशन ग्रेज अॅल्यूमिनियम अलॉय मटेरियलचा वापर करण्यात आला आहे. यात पॉवर बटन सोबत फिंगरप्रिंट रिकॉग्निशन आगे. RedmiBook Pro १४ चे स्किरिन रिकॉग्निशन २५६०x१४४० पिक्सल, आहे, तर RedmiBook Pro १५ चा डिस्प्ले रिफ्रेश रेट९० हर्ट्ज आणि स्क्रीन रिझॉल्यूशन ३२००x२००० पिक्सल आहे. या दोन्ही लॅपटॉपचा व्यूइंग अँगल १७८ डिग्री आहे. रेडमी बुक प्रो मध्ये ६५ वॉट आणि रेडमी बुक प्रो १५ मध्ये १०० वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळेल. रेडमीबुक प्रो राइजन एडिशन लॅपटॉप हरीकेन कूलिंग सिस्टमसोबत येतो, ज्यामुळे गेम खेळताना लॅपटॉप गरम होत नाही. वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2SAC4In