नवी दिल्ली: लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुक अनेक सामाजिक बांधिलकी उपक्रम राबवत असते. सध्या भारतात करोनमुळे परिस्थिती गंभीर असून अशात फेसबुकने युझर्सची मदत करण्याच्या दृष्टीने पुढाकार घेतला आहे. करोना लस शोधण्यात मदत करण्यासाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकने पुढाकार घेतला आहे. कंपनीने Covid-19 Vaccine Finder Tool असे एक फिचर सादर केले आहे. सांगितले जात आहे की, हे टूल केवळ भारतातच सुरु करण्यात आले आहे. वाचा : हे टूल भारत सरकारच्या भागीदारीत तयार करण्यात आले असून याद्वारेच फेसबुक अॅपमध्येच भारतीय युझर्सना या साधनाच्या मदतीने लसी देण्यात आली आहे. लास घेणाऱ्यांची संख्या मोठी असल्यामुळे बर्याच वेळा लोकांना जवळचे लस केंद्र शोधण्यात अडचण येते. त्यासाठी त्यांना इतर मार्ग शोधावे लागतात. फेसबुकच्या Covid-19 Vaccine Finder Tool च्या एका अहवालानुसार, भारतात दररोज कोट्यवधी लोकांना या विषाणूची लागण होत आहे, अशा परिस्थितीत फेसबुकने भारताला सुमारे १० कोटी डॉलर्स मदत केली असून यामुळे भारतीयांना करोना विरुद्ध लढण्यात बळ मिळू शकेल. Vaccine Finder Tool लस ट्रॅकर टूलच्या मदतीने, लोक त्यांच्या जवळील लस केंद्र शोधू शकणार . इतकेच नाही तर लोकांना आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय एमएचएफडब्ल्यूशी संबंधित माहिती देखील यावर मिळू शकेल. या फेसबुक Vaccine Finder Tool माध्यमातून, लस भेटीची नोंद आणि वेळापत्रक निश्चित करण्यासाठी लिंकसह वॉक-इन पर्याय देखील उपलब्ध करून दिले जाईल . हे ४५ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या लोकांसाठी आहे. फेसबुकने आपल्या Vaccine Finder Tool विषयी एका पोस्टमध्ये म्हटले आहे की हे टूल भारत सरकारच्या भागीदारीत सादर केले गेले आहे. जे लस केंद्राच्या शोधात आहेत त्यांना मदत करेल. हे तब्बल १७ भाषांमध्ये उपलब्ध आहे. फेसबुक लवकरच आपल्या मोबाइल अॅपमध्ये Vaccine Finder Tool रोलआऊट करणे सुरु करणार आहे. युनाइटेड वे, स्वास्थ्य, हेमकुंट फाउंडेशन, आयएम गुडगाव, प्रोजेक्ट मुंबई आणि यूएस-इंडिया स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप फोरम (यूएसआयएसपीएफ) यांच्याबरोबरही भागीदारी करणार असल्याचे फेसबुकतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे . हे ५,००० हून अधिक ऑक्सिजन केंद्रे आणि व्हेंटिलेटर, बीआयपीएपी मशिन सारख्या वैद्यकीय पुरवठ्यांचा साठा तयार करण्यात देखील मदत करणार आहे. वाचा : वाचा : वाचा :
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3b3nboE