Full Width(True/False)

भारतीय संस्कृतीची थट्टा उडवणाऱ्याला ऐश्वर्या रायने दिलं उत्तर

मुंबई- 'मिस वल्ड' चा किताब जिंकणारी अभिनेत्री हिने फक्त बॉलिवूडचं नाही तर हॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. भारताप्रमाणे जगभरात तिचे चाहते आहेत. तिने 'ब्राइड अँड प्रीजुडाइस' आणि 'मिस्ट्रेस ऑफ स्पाइसेस' या हॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केलं आहे. सध्या सोशल मीडियावर ऐश्वर्या रायचा एका व्हिडिओची चर्चा आहे ज्यात तिने 'ब्राइड अँड प्रीजुडाइस' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी एका अमेरिकन टीव्ही शोमध्ये हजेरी लावली होती. या कार्यक्रमात भारतीय संस्कृतीची थट्टा करणाऱ्यावर ऐश्वर्याने जबरदस्त उत्तर देत सगळ्यांची बोलती बंद केली होती. ऐश्वयाने अमेरिकन टीव्ही शो '' मध्ये हजेरी लावली होती. या कार्यक्रमात ऐश्वर्याला भारतीय संस्कृतीशी संबंधित अनेक प्रश्न विचारण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालक डेविड लेटरमॅन यांनी ऐश्वर्याला विचारलं की, तुम्ही अजूनही तुमच्या आई- वडिलांसोबत राहता? भारतात मुलं मोठी झाल्यावरही आई- वडिलांसोबत राहतात हे इतकं सहज आहे का?' खरं तर डेविड यांना हे दाखवून द्यायचं होतं की भारतीय संस्कृती अजूनही जुन्या रूढी परंपरा जपते. कारण, अमेरिकेत मुलं मोठी झाल्यावर आपल्या आई- वडिलांच्या घरात राहत नाहीत. परंतु, ऐश्वर्यानेही अत्यंत चलाखीने उत्तर देत डेविड यांची बोलती बंद केली होती. ऐश्वर्याने यावर देत म्हटलं, 'हो, मी माझ्या आई- वडिलांसोबत राहते कारण, भारतात आपल्या आई- वडिलांसोबत राहणं खूप सहज आहे. यात काही नवल नाही. त्यामुळे आम्हाला आमच्याच आई- वडिलांना भेटण्यासाठी किंवा त्यांच्यासोबत जेवण्यासाठी खास वेळ घेण्याची गरज पडत नाही.' ऐश्वर्याच्या या उत्तरावर तिथे उपस्थित सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवल्या होत्या. तर दुसरीकडे डेविड यांचा चेहराही पाहण्यासारखा झाला होता.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3vzo6F3