मुंबई : देशभरात कोरोनाचा फैलाव वेगाने होत असून रुग्णसंख्याही झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे देशातील प्रत्येक नागरिकाने आपापल्या परीने मदत करण्याचे आवाहन मराठी आणि हिंदी सिनेमांतील कलाकरांनी केले आहे. तसेच काही कलाकारांनीही मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. करोनाविरोधात लसीकरण मोहिम देशात सुरू झाली आहे. कोरोना व्यतिरिक्त इतर अनेक आजारांच्या रुग्णांवर उपचार करताना रक्ताचा तुटवडा जाणवतो आहे. त्यामुळे करोनाची लस घेण्याआधी निरोगी व्यक्तींनी रक्तदान करावे असे सातत्याने आवाहन के जात आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत 'सैराट' या सिनेमातून प्रसिद्ध झालेला अभिनेता यानेही रक्तदान केले असून त्याचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. हा फोटो पोस्ट करत त्याने चाहत्यांनाही रक्तदान करण्याचे आवाहन केले आहे. आकाशने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर रक्तदान करतानाचा फोटो पोस्ट केला आहे. हा फोटो पोस्ट करत त्याने लिहिले आहे की, ‘आपल्या प्रत्येकाला वाटत असते की देशासाठी काहीतरी करावे, उपयोगी पडावे. मला लहानपणी पोलीस किंवा आर्मीमध्ये भरती होऊन देशसेवा करायची होती. पण ते शक्य झाले नाही. आज करोनाच्या लढ्यात वेगवेगळ्या क्षेत्रातले अनेक लोक आपल्यासाठी झटत आहेत, ते देशसेवाच करत आहेत. मग आपल्यालाही काय करता येईल? करोनामुळे आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण आला आहे. त्यातच रक्ताचाही तुटवडा भासतोय. १ मे पासून तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणाला सुरुवात होत आहे. या काळात १८ वर्षांवरील सर्वांना लस घेता येणार आहे. पण एकदा लस घेतल्यानंतर पुढील ६० दिवस म्हणजेच दोन महिने रक्तदान करता येणार नाही. त्यामुळे या तिसऱ्या टप्प्यात लस घेणाऱ्यांनी आधी रक्तदान करणे गरजेचे आहे. करोनातून बरे झालेल्यांनी प्लाझ्मा दान आणि बाकीच्यांनी रक्तदान. सगळ्यांना आवाहन तर करुयाच पण त्याआधी आपल्या स्वतःलाच आवाहन करणे गरजेचे आहे. म्हणजे मग एक साखळी तयार होईल. लोकांना दाखवण्यासाठी नाही तर एकमेकांना प्रेरणा मिळावी हा शुद्ध हेतू ठेऊयात. एकमेकांना मदत करून, जमेल तसा एकमेकांना आधार देऊन आपले 'रक्ताचं' नातं अजून घट्ट करूयात,' अशी पोस्ट आकाशने लिहिली. आकाश ठोसरच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर तो शेवटचा '१९६२ : द वॉर इन द हिल' या सीरिजमध्ये दिसला होता. याशिवाय लवकरच तो नागराज मंजुळे दिग्दर्शित आणि अमिताभ बच्चन यांची मुख्य भूमिका असलेला चित्रपट 'झूंड'मधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात त्याच्यासोबत आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरू सुद्धा दिसणार आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3eKIGeS