Full Width(True/False)

डिलीट न करता लपवायचे आहे WhatsApp चॅट? फॉलो करा ‘ही’ सोपी ट्रिक

नवी दिल्ली : भारतात इंस्टंट मेसेजिंग अ‍ॅप वापरणाऱ्यांची संख्या प्रचंड मोठी आहे. विद्यार्थ्यांपासून ते उद्योगपतींपर्यंत सर्वचजण वेगवेगळ्या कामांसाठी या अ‍ॅपचा वापर करतात. मात्र, व्हॉट्सअ‍ॅपमधील आपले चॅट सुरक्षित ठेवणे देखील गरजेचे असते. दुसऱ्या व्यक्तीने तुमचे अकाउंट उघडू नये म्हणून फेसआयडी आणि पासवर्ड प्रोटेक्शनची सुविधा मिळते. मात्र, तुम्ही एखाद्या खास व्यक्तीसोबत केलेले चॅट डिलीट न करता लपवायचे असेल तर ? वाचाः आज आम्ही तुम्हाला अशीच एक ट्रिक सांगणार आहेत, ज्याच्या मदतीने तुम्ही चॅटला विना डिलीट करता सर्वांपासून लपवू शकता. जर एखाद्या व्यक्तीने तुमचे WhatsApp उघडले तर त्याला चॅट दिसणार नाही. WhatsApp मध्ये Archive नावाचे फीचर मिळते, याचा वापर करून तुम्ही चॅट लपवू शकता. याचा वापर कसा कराल, जाणून घेऊया. वाचाः यूजर कसे लपवू शकतात चॅट ?
  • सर्वात प्रथम WhatsApp ओपन करा आणि तुम्हाला जे चॅट लपवायचे आहे त्यावर जा.
  • या चॅटला न उघडता त्यावर लाँग प्रेस करा अर्थात दाबून ठेवा.
  • चॅटवर लाँग प्रेस केल्यानंतर त्यावरती एक फोल्डरचा आयकॉन येईल, ज्यात Arrow चे चिन्ह असेल.
  • या आयकॉनवर क्लिक केल्यानंतर ते चॅट Archive मध्ये जमा होईल.
  • या स्टेप पूर्ण केल्यावर चॅट गायब होईल व कितीही स्क्रॉल केले तरी दिसणार नाही.
यूजर कसे लपवू शकतात चॅट
  • आयफोन युजर्सनी WhatsApp मध्ये त्या कॉन्टॅक्टमध्ये जाऊन चॅटवर राइड स्वाइप करावे.
  • राइट स्वाइप केल्यानंतर More आणि Archive लिहिलेले दिसेल. तेथे Archive वर टॅप करा.
  • Archive वर क्लिक केल्यानंतर चॅट गायब होईल.
वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3g1aKLL