Full Width(True/False)

एका अटीमुळे तुटलं राज कपूर आणि नर्गिस यांचं नऊ वर्षांचं नातं

मुंबई- वयाच्या पाचव्या वर्षी चित्रपटसृष्टीत अभिनयाची सुरुवात करणाऱ्या अभिनेत्री यांना आजही प्रेक्षकविसरलेले नाहीत. अभिनयाने आणि सौंदर्याने त्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली. जवळपास तीन दशकं त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीवर राज्य केलं. ३ मे १९८१ रोजी त्यांचं कर्करोगाने निधन झालं. अभिनयाच्या कारकिर्दीत त्यांचं नाव सगळ्यात जास्त जोडलं गेलं ते अभिनेते यांच्याशी. दोघांच्या अफेअरची चर्चा तेव्हा प्रत्येकाच्या तोंडी असायची. मात्र एका अटीमुळे नर्गिस आणि राज कपूर यांचं नातं तुटलं होतं. नर्गिस आणि राज कपूर यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं. आवडत्या जोडींपैकी एक अशी त्यांची जोडी होती. खऱ्या आयुष्यातही दोघं एकमेकांवर जीवापाड प्रेम करायचे. परंतु, राज कपूर यांचं पूर्वीच लग्न झालं होतं. नात्याला नऊ वर्ष झाल्यावर नर्गिस यांनी राज कपूर यांना त्यांच्या पत्नीला घटस्फोट देण्यास सांगितला. परंतु, राज यांनी स्पष्ट नकार दिला. यानंतर नर्गिस यांनी राज यांच्यासोबतच नातं संपवलं. त्यानंतर नर्गिस यांच्या आयुष्यात आले अभिनेते . हिंदी चित्रपटसृष्टीतील मैलाचा दगड मानला जाणारा चित्रपट 'मदर इंडिया' मध्ये नर्गिस आणि सुनील यांची मुख्य भूमिका होती. चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान नर्गिस सुनील यांच्याशी फार बोलत नसत. परंतु, एकेदिवशी चित्रीकरणादरम्यान घडलेल्या घटनेत सुनील यांनी जीव धोक्यात घालून नर्गिस यांचा जीव वाचवला होता. त्यानंतर नर्गिस आणि सुनील यांच्यात मैत्री झाली. त्यांच्यातील मैत्रीचं रूपांतर नंतर लग्नात झालं. १९५८ साली त्यांनी लग्न केलं. त्यांना तीन मुलंही झाली. संजय दत्त, प्रिया दत्त आणि नम्रता दत्त. १९८० साली त्या आजारी पडल्यानंतर त्यांच्या आजाराचं निदान झालं. त्या दहा महिने कर्करोगाशी झुंज देत होत्या. मात्र या आजारात त्यांचं निधन झालं. नर्गिस यांच्या निधनावेळी संजय दत्त फक्त २२ वर्षांचा होता.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3eQs59o