Full Width(True/False)

करोना- पत्रकार- समीक्षक राजीव मसंद यांची प्रकृती गंभीर

मुंबई- देशात करोनाचा प्रसार झपाट्याने वाढत आहे. दिवसेंदिवस रुग्णसंख्येत वाढ होत आहे. देशातील परिस्थिती गंभीर आहे. आरोग्य यंत्रणा दिवसरात्र काम करत आहे. महामारीला आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. परंतु, त्याचा फारसा उपयोग होताना दिसत नाहीए. यापूर्वी अनेक बॉलिवूड कलाकारांनादेखील करोनाची लागण झाली आहे. आता प्रसिद्ध सिनेपत्रकार आणि समीक्षक यांना करोनाची लागण झाली आहे. राजीव यांची प्रकृती नाजूक असल्याचं म्हटलं जात आहे. एका वृत्तवाहिनीने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, राजीव यांना काही दिवसांपूर्वी करोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर उपचार सुरू होते. परंतु त्यांची तब्येत बिघडत गेली आणि शरीरातील ऑक्सिजनची पातळी कमी होऊ लागली. प्रकृती खालावत गेल्याने राजीव यांना कोकिलाबेन धीरूभाई अंबानी इस्पितळात भरती करण्यात आलं आहे. डॉक्टरांनी त्यांची तब्येत नाजूक असल्याचं सांगितलं आहे. सोनी पिक्चर्सचे क्रिएटिव्ह हेड लादा गुरुदेन सिंग यांनी ट्वीट करत राजीव व्हेंटिलेटरवर नसल्याचं स्पष्ट केलं आहे. राजीव यांची तब्येत नाजूक असली तरी त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलेलं नाही असं सिंग यांनी म्हटलं. मागील काही दिवसात अनेक बॉलिवूड कलाकारांना करोनाची लागण झाली आहे. नुकतीच छोट्या पडद्यावरील सूत्रसंचालक आणि अभिनेत्री कनूप्रियाचं करोनामुळे निधन झालं. याशिवाय टीव्ही अभिनेता अनिरुद्ध दवे देखील करोनामुळे आयसीयूमध्ये आहे. अभिनेते मेजर बिक्रमजीत कंवरपाल यांचंही करोनामुळे निधन झालं.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/337paE3