Full Width(True/False)

'तुमच्यावरही वेळ येईलच' दिग्दर्शकाला सुशांतच्या चाहत्यांनी सुनावलं

मुंबई: बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूतनं मागच्या वर्षी म्हणजेच १४ जून २०२० रोजी आत्महत्या करत आपलं जीवन संपवलं. सुशांतच्या निधनानंतर अनेक दिवस त्याच्या आत्महत्येवरून वाद होत राहिले. सुरुवातीला हे प्रकरण मुंबई पोलिसांकडे होतं पण सुशांतच्या वडिलांनी तक्रार दाखल केल्यानंतर ही केस सीबीआयकडे सोपवण्यात आली. पण सीबीआयच्या व्यतिरिक्त ईडी आणि एनसीबी यासारख्या एजन्सी देखील या केसवर काम करत आहेत. नुकतंच सुशांतशी संबंधीत ड्रग्स प्रकरणात त्याचा मित्र सिद्धार्थ पिठानी याला अटक करण्यात आली. त्यानंतर आता सुशांतच्या पहिल्या पुण्यतिथीच्या अगोदर दिग्दर्शक त्यांच्या एका ट्वीटवरून युझर्सच्या निशाण्यावर आले आहेत. दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांनी शुक्रवारी एक ट्वीट केलं होतं. ज्यानंतर सुशांतसिंह राजपूतच्या चाहत्यांनी सोशल मीडियावरून त्यांना सुनावयला सुरुवात केली आहे. अनुभव सिन्हा यांनी आपल्या ट्वीटमध्ये लिहिलं, 'एसएसआर सीझन २. लवकरच येत आहे...' अनुभव सिन्हा यांनी हे असं ट्वीट का केलं आणि त्यातून ते नेमकं काय सांगू इच्छित आहेत. हे स्पष्ट झालेलं नाही पण त्यांच्या या ट्वीटचा संबंध सुशांतशी जोडून युझर्सनी अनुभव सिन्हा यांना चांगलंच सुनावलं आहे. अनुभव सिन्हा यांच्या ट्वीटवर प्रतिक्रिया देताना एका युझरनं लिहिलं, 'तुम्ही कोणाच्या निधनाची खिल्ली उडवत आहात का?' तर अन्य एका युझरनं लिहिलं, 'एवढा मत्सर? तुमचीही वेळ येणार आहे. थोडा धीर धरा.' अशाप्रकारे अनेक युझर्सनी अनुभव सिन्हांच्या ट्वीटवरून टीका केली आहे. सुशांतसिंह राजपूतशी संबंधीत ड्रग्स प्रकरणी सुरू असलेल्या तपासणीत एनसीबीनं शुक्रवारी सुशांतचा फ्लॅटमेट आणि मित्र सिद्धार्थ पिठानी याला अटक केली आहे. एनसीबीच्या टीमनं सिद्धार्थला हैदराबाद येथून अटक केली. त्याला ५ दिवसांसाठी कस्टडीमध्ये ठेवण्यात येणार आहे. या प्रकरणात या आधी सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीला देखील अटक झाली होती. पण एक महिन्यानंतर ती जामिनावर तुरुंगातून बाहेर आली आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3uxMgyE