Full Width(True/False)

'मुझसे दोस्ती करोगे'च्या छोट्या करिनाला ओळखलं? आता 'अशी' दिसते

मुंबई: अभिनेत्री बरखा सिंगनं आपल्या करिअरची सुरुवात बालकलाकार म्हणून वयाच्या १० वर्षी केली होती. तिचा पहिला चित्रपट होता '' ज्यात करिना कपूरव्यतिरिक्त अभिनेत्री राणी मुखर्जी, अभिनेता हृतिक रोशन यांच्या मुख्य भूमिका होत्या. याच चित्रपटात बालपणीच्या करिना कपूरची भूमिका बरखा सिंगनं साकारली होती. आता १९ वर्षांनंतर सौंदर्याच्या बाबतीत ती आघाडीच्या अभिनेत्रींनाही टक्कर देताना दिसते. नुकत्या दिलेल्या एका मुलाखतीत बरखानं 'मुझसे दोस्ती करोगे' चित्रपटातील आपल्या भूमिकेबद्दल गप्पा मारल्या. यावेळी तिनं या भूमिकेच्या निवडीसाठी तिनं किती कठीण ऑडिशन दिली होती हे सुद्धा सांगितलं. ती म्हणाली, 'मला आठवतंय मी त्या भूमिकेसाठी ऑडिशन दिली होती आणि ती पूर्ण प्रक्रियाच खूप कठीण होती. त्या ठिकाणी छोट्या टीनाच्या ऑडिशनसाठी जवळपास ६००-७०० मुलं आली होती आणि मी शाळा संपल्यानंतर आरामात ऑडिशनला पोहोचले होते. ही ऑडिशन मी यासाठी दिली होती की, घरी परत जाताना आई मला आइस्क्रिम देईल.' बरखा पुढे म्हणाली, 'मला ती भूमिका मिळाली, पण त्यासाठी ५ वेळा ऑडिशन द्यावी लागली होती. माझी ती भूमिका आजही लोकांच्या आठवणीत आहे आणि मी कुठेही गेल्यावर टीना म्हणून हाक मारतात. पण मला या गोष्टीचा आनंद आहे की माझं आताचं कामही प्रेक्षकांना आवडत आहे.' बरखा सिंगनं या मुलाखतीत सांगितलं की, लोक तिला आजही छोटी करिना म्हणून हाक मारतात. बालकलाकार म्हणून बरखानं जास्त काम केलं नाही. पण मोठ्या पडद्यावर तिनं बरेच प्रोजेक्ट केले आहेत. ती म्हणते, 'आजही बरेच लोक मला छोटी करिना म्हणूनच ओळखतात आणि ती भूमिका लोकांच्या आजही लक्षात आहे हे पाहून मला आश्चर्य वाटतं. लोकांच्या मते माझा चेहरा आजही तसाच आहे जसा मी 'मुझसे दोस्ती करोगे'मध्ये काम केलं तेव्हा होता.' बरखानं २०१३ मध्ये टीव्ही इंडस्ट्रीमध्ये पाऊल टाकलं. तिनं 'ये है आशिकी' या मालिकेतून पदार्पण केलं होतं. त्यानंतर तिनं 'एमटीवी फना', 'लव बाय चांस', 'भाग्यलक्ष्मी', 'आहट 6', 'कैसी ये यारियां' आणि 'ब्रीद' या टीव्ही शोमध्ये दिसली. याशिवाय नुकतीच ती 'Silence Can You Hear It?' या वेब सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. लवकरच तिची आणखी एक वेब सीरिज 'मर्डर मेरी जान' रिलीज होणार आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3enLsHY