मुंबई- बॉलिवूड अभिनेता याने १४ जून २०२० मध्ये राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली होती. सुशांतच्या मृत्यूला जबाबदार धरत रियाला प्रचंड ट्रोल केलं गेलं होतं. सुशांतच्या वडिलांनीदेखील रियाविरुद्ध तक्रार दाखल केली अजून त्यावर अजून निर्णय येणं बाकी आहे. चौकशीदरम्यान रियाला सुशांतच्या मृत्यूशी संबंधित असलेल्या ड्रग्ज प्रकरणामध्ये अटक करण्यात आली होती. रिया सध्या जामिनावर बाहेर आहे. या सगळ्या घटनांचा तिच्या आयुष्यावर खोलवर परिणाम झाला. रिया काही महिने सोशल मीडियापासून दूर होती. परंतु, आता हळूहळू रिया सोशल मीडियावर पुन्हा सक्रिय होऊ लागली आहे. सुशांतच्या मृत्यूला एक वर्ष पूर्ण होण्यापूर्वी रियाने एक भावनिक पोस्ट केली आहे. सुशांतच्या पहिल्या पुण्यतिथीच्या काही दिवस आधी रियाने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत. रियाने लिहिलं, 'मोठ्या दुःखातून गेल्यावर आपण जास्त मजबूत होतो. तुम्हाला फक्त माझ्यावर विश्वास ठेवावा लागेल. माझी वाट पाहा. लव्ह, रिया.' रियाच्या या पोस्टवर अनेक कलाकारांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत. यासोबतच अनेक चाहत्यांनीही रियाला धीर दिला आहे. तर काही चाहत्यांनी तिला विरोध करत आता या सगळ्याचा काहीही उपयोग नसल्याचं म्हटलं आहे. रिया लवकरच अमिताभ बच्चन आणि इम्रान हाश्मी यांच्यासोबत 'चेहरे' चित्रपटात झळकणार आहे. 'चेहरे' चित्रपटाच्या पोस्टरमध्ये रियाचा समावेश करण्यात आला नव्हता. त्यामुळे रिया चित्रपटात आहे की नाही याबाबत प्रेक्षकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. परंतु, चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये रियाची एक झलक पाहायला मिळाली. 'चेहरे' ९ एप्रिल रोजी प्रदर्शित करण्यात येणार होता. परंतु, करोनासदृश्य परिस्थितीमुळे 'चेहरे' च्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3oYdpcV