Full Width(True/False)

मोटोरोलाची धमाका ऑफर! Moto G60, Moto G40 Fusion, E7 Power सह अनेक स्मार्टफोन्सवर बंपर सूट

नवी दिल्लीः मोटोरोला पुन्हा एकदा आपल्या लेटेस्ट स्मार्टफोन्सवर ऑफर्स आणि डिल्स सोबत आले आहे. Flipkart Shop From Home Days सेलमध्ये कंपनीचे अनेक स्मार्टफोन्स Moto G60, Moto E7 Power, Moto G40 Fusion ला सूट सोबत खरेदी करू शकता. फ्लिपकार्टवरून फोनला खरेदी केल्यास HDFC डेबिट/क्रेडिट कार्ड ईएमआय ट्रान्झॅक्शनद्वारे खरेदी केल्यास १० टक्के (१ हजार रुपयांपर्यंत) सूट मिळणार आहे. वाचाः मोटो जी १० पॉवर कंपनीचा हा अफॉर्डेबल स्मार्टफोन या सेलमध्ये ९ हजार ४९९ रुपयात खरेदीसाठी उपलब्ध आहे. या फोनमध्ये ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा सोबत क्वॉड कॅमेरा सेटअप आणि 6000mAh ची बॅटरी दिली आहे. मोटो ई ७ पॉवर स्मार्टफोनला ६ हजार २९९ रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत खरेदी करण्याची संधी आहे. यात एचडीएफसी ईएमआय ट्रान्झॅक्शन द्वारे खरेदी केल्यास १ हजार रुपयांचा डिस्काउंटचा समावेश आहे. फोनच्या २ जीबी रॅम प्लस ३२ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत ६ हजार २९९ रुपये तर ४ जीबी रॅम व ६४ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत ७ हजार १९९ रुपये आहे. फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी आणि ६.५ इंचाचा मॅक्स व्हिजन एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. वाचाः मोटो जी ६० स्मार्टफोन एचडीएफसी क्रेडिट सोबत खरेदी केल्यास ७५० रुपयांची सूट सोबत १७ हजार २४९ रुपयात घेऊ शकता. तर क्रेडिट कार्ड आणि ईएमआय ट्रान्झॅक्शनवर १ हजार रुपयांची सूट मिळणार आहे. याला १६ हजार ९९९ रुपयात खरेदी करण्याची संधी आहे. या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 732G प्रोसेसर, 108 मेगापिक्सल प्राइमरी रियर कॅमेरा आणि 32 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा सारखी फीचर्स दिली आहेत. वाचाः मोटो जी ४० फ्यूजन स्मार्टफोनम एचडीएफसी क्रेडिट कार्डवरून खरेदी केल्यास ७५० रुपयांच्या सूट सोबत १३ हजार २४९ रुपयांत खरेदी करता येऊ शकतो. तर ईएमआय ट्रान्झॅक्शनवर स्मार्टफोन खरेदी केल्यास १२ हजार ९९९ रुपयांत मिळू शकेल. या फोनमध्ये 6000mAh बॅटरी, 64 मेगापिक्सल क्वॉड फंक्शन कॅमेरा सिस्टम, स्टॉक अँड्रॉयड एक्सपीरियंस मिळतो. वाचाः फ्लिपकार्ट सेल मध्ये स्टायलिश मोटो रेज ५जी ला बँक ऑफर सोबत ८८,९९९ रुपयात खरेदी करू शकता. हँडसेट मध्ये ६.२ इंचाचा फोल्डेबल ओलेड डिस्प्ले दिला आहे. याशिवाय, बँक ऑफर सोबत मोटो ई ७ प्लसला ९ हजार ४९९ रुपयाऐवजी ८ हजार ९९९ रुपये, मोटो जी ५ जी ला २० हजार ९९९ रुपयांऐवजी १९ हजार ९९९ रुपये, मोटो जी ९ पॉवरला ११ हजार ९९९ रुपयांऐवजी १० हजार ९९९ रुपये, मोटो जी ३० ला १० हजार ९९९ रुपयाऐवजी ९९९९ रुपयात खरेदी करण्याची संधी आहे. वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2RIAvs5