मुंबई: स्टार प्लसवरील मालिका 'साथ निभाना साथिया'मधील गोपी बहू अर्थात अभिनेत्री लवकरच एका वेब सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आकाश गोयला यांची वेब सीरिज लंच स्टोरीजचा चॅप्टर २- द डेट स्टोरी हॉटस्टारवर रिलीज होणार आहे. ज्यात देवोलिना मोलकरणीच्या भूमिकेत दिसणार आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत देवोलिनानं तिच्या या भूमिकेबद्दल सविस्तर सांगितलं. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत बोलताना देवोलिना म्हणाली, मी २०१९ मध्ये वेब सीरिज 'स्वीट लाय'मधून डिजिटल डेब्यू केला होता. ही माझी पहिली वेब सीरिज होती. जेव्हा ओटीटी प्लॅटफॉर्म हळूहळू वेग धरत होता. त्यावेळी माझी वेब सीरिज एका हाऊसवाइफची क्यूट स्टोरी होती. त्यानंतर आता ही माझी दुसरी वेब सीरिज आहे. मी या वेब सीरिजच्या बाबतीत खूप खूश आहे कारण ही भूमिका तुमच्या आसपास असणाऱ्या लोकांपैकीच एक आहे. प्रत्येक व्यक्तीची वेगवेगळी स्वप्न असतात आणि जेव्हा अशा दोन व्यक्ती एकत्र येतात. त्यावेळी काय होतं हे 'लंच स्टोरी २'मध्ये दाखवण्यात आलं आहे. देवोलिना पुढे म्हणाली, 'लंच स्टोरी चॅप्टर १ मध्ये कोविड योद्ध्यांची म्हणजेच त्या डॉक्टर्स आणि नर्सची कथा दाखवण्यात आली होती. जेव्हा आपलं कर्तव्य पूर्ण करण्यासाठी आपल्या कुटुंबापासून दूर राहतात. तर आता चॅप्टर २ मध्ये एक मोलकरीण आणि तिची मालकीण यांची कथा साकारण्यात आली आहे आणि मी यामध्ये मोलकरणीची भूमिका साकारत आहे. ही दोन वेगवेगळ्या स्त्रियांची कहाणी आहे आणि मी यातील भूमिका खूप एन्जॉय केली आहे.' आपल्या भूमिकेबद्दल देवोलिना म्हणते, 'ही भूमिका साकारण्याआधी मला बराच अभ्यास करावा लागला. मी माझ्या घरातील मेड कडून बऱ्याच गोष्टी शिकले. माझ्या घरी बऱ्याच मेड येतात त्यामुळे मला अनेक गोष्टी कनेक्ट करून शिकता आल्या. त्यांच्या काही गोष्टी लक्षात घेत मी त्या माझ्या भूमिकेत उतरवण्याचा प्रयत्न केला. मी त्यांच्याकडून प्रेरित झाले आहे. जेव्हाही मी एखादा सीन शूट करत असे त्यावेळी त्यांना नजरेसमोर आणून तो सीन करत असे. ती याठिकाणी असती तर तिने काय केलं असतं असा विचार करून मी माझा सीन शूट करत असे. माझं माझ्या घरातील मेडसोबत चांगलं बॉन्डिंग आहे ज्याचा फायदा मला या वेब सीरिजसाठी झाला.'
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3ub95ZT