मुंबई- अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या खटल्याचा ५ मे रोजी निकाल लागला. राज्य सरकारने बनवलेला कायदा सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला. यामुळे सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसला. मराठा आरक्षणाच्या कायद्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं होतं. त्यावर निकाल सुनावत एस. अब्दुल नाझीर, अशोक भूषण, नागेश्वर राव, हेमंत गुप्ता आणि रवींद्र भट यांच्या खंडपीठाने हा कायदा रद्द केला. यावर प्रसिद्ध मराठी दिग्दर्शक आणि निर्माते यांनी चिंता व्यक्त केली आहे. मराठा आरक्षणाच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर केदार यांनी केलेलं ट्वीट सध्या चर्चेत आहे. त्यांनी मराठी भाषेबद्दल चिंता व्यक्त करत लिहिलं, 'आजचा मराठा आरक्षणाबद्दलचा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल धक्कादायक होता. आरक्षण नाही, भाषेला अभिजात दर्जा नाही, मायभूमीत म्हणावा तसा टक्का नाही!' असं ट्वीट करत केदार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. मराठी भाषेला मिळायला हवं तितकं महत्त्व महाराष्ट्रात मिळत नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे. इतर भाषांप्रमाणे आपल्या माय मराठीला अभिजात भाषेचा दर्जा नसल्याची खंत त्यांनी ट्वीटद्वारे व्यक्त केली. केदार शिंदे यांच्या या ट्वीटचं अनेकांनी समर्थन केलं आहे. काहींच्या मते या संपूर्ण प्रकारासाठी मराठी माणूसचं जबाबदार आहे. एका युझरने केदार यांची बाजू उचलून धरत लिहिलं, 'याला आपण मराठीच कारणीभूत आहोत! भाषा शुद्ध बोलण्यात रस नाही, मराठी बाणा दाखविण्यात प्रचंड भिडस्तपणा आणि केंद्रीय राजकारणात महाराष्ट्राची बाजू कणखरपणे व ठामपणे मांडण्यात नेहमीच धरसोड वृत्ती. महाराष्ट्रात मात्र विशिष्ट आमदार-खासदारांची महाराष्ट्रद्रोही व विरोधी भूमिका.' तर एका युझरने लिहिलं, 'आपणच आपली मराठी अस्मिता जपली नाही तर मग देश आपल्यासाठी काय करेल?'
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/33gUYGB