Full Width(True/False)

ती पंधरा मिनीटं आमच्यासाठी सर्वात कठीण होती; अभिनेत्याच्या पत्नीने सांगितला अनुभव

मुंबई : 'इश्काबाज'मधील लोकप्रिय अभिनेता आणि त्याची पत्नी यांना ३ फेब्रुवारी २०२१ या दिवशी सर्वात मोठा आनंदाचा ठेवा मिळाला. हा ठेवा त्यांना त्यांचा सूफीच्या रुपाने मिळाला आहे. सूफाचा जन्म झाल्यानंतर दोन महिन्यांनंतर जानकीने एक तिच्या सोशल मीडियावर शेअर केली आहे. जानकीची डिलिव्हरी सिझरीनने करण्यात आली होती. या पोस्टमध्ये तिने डिलिव्हरीवेळचा अनुभव शेअर केला आहे. इतकेच नाही तर सूफीच्या जन्मानंतर त्याच्यावर एक छोटेसे ऑपरेशनही करण्यात आले होते... हा सगळा अनुभव जानकीने तिच्या पोस्टमध्ये शेअर केला आहे जानकीने तिच्या इन्स्टाग्रामवर तीन फोटो शेअर केले आहेत. पहिल्या फोटोमध्ये ती आणि नकुल त्यांच्या नवजात बाळासह ऑपरेशन थिएटरमध्ये दिसत आहेत, दुस-या फोटोमध्ये व्हिडीओ कॉलचा स्क्रीन शॉट असून त्यामध्ये त्या दोघांचे आईवडिल दिसत आहेत. तर तिस-या फोटोमध्ये जानकीचे सिझरीन होत असताना नकुलने तिचा हात धरून ठेवलेला फोटो आहे... जानकीने हे तिन फोटो शेअर करत एक मोठी पोस्ट लिहिली आहे. तिने यात लिहिले आहे, ' मला नेहमीच आश्चर्य वाटते की जर माझे नॉर्मल बाळंतपण झाले असती तर कसे झाले असते... आमचे बाळ या जगात येण्याआधी लेबर रुमध्ये मला अनेक तास रहावे लागले असते. मला एका मैत्रिणीने सांगितले की, अशा प्रकारच्या बाळंतपणामुळे मी लवकर बरी झाली असते. परंतु तो अनुभव इतका सुंदर आणि आम्हांला परिपूर्ण बनवणारा असता का? ३ फेब्रुवारी २०२१ रोजी सिझरीनद्वारे मी माझ्या बाळाला सूफीला जन्म दिला आहे...' नकुलच्या डोळ्यांत दिसला आनंद जानकीने पुढे लिहिले आहे की, ' मला बाळंतपणाच्या कळांचा अनुभव नाही आणि नॉर्मल बाळंतपणाचाही अनुभव नाही. परंतप माझ्या साथीदाराने ज्या प्रकारे माझा हात ज्या विश्वासाने पकडला होता, माझ्या पोटातून एक नवीन जीव बाहेर आला... हा सारा अनुभव आमच्यासाठी खूप आनंददायी होता. याची तुलना कोणत्याही गोष्टींशी होऊच शकत नाही. हे मी सगळं माझ्या नव-याच्या नकुल मेहताच्या डोळ्यांत दिसत होते. मी खूप नशीबवान आहे, माझ्या डॉक्टर द्रुपति डधिया यांच्यासह माझ्या अॅनास्थिशिया आणि सूर्या हॉस्पिटलच्या सगळ्या नर्सनी माझी खूप काळजी घेतली.' आमच्या आयुष्यातील ती १५ मिनिटे सर्वात अमूल्य जानकीने या पोस्टमध्ये तिच्या नव-याचे नकुलचे खूप कौतुक केले आहे. ती म्हणते, ' या सगळ्या गोष्टींपेक्षा सर्वात महत्त्वाचे होते ते सूफीच्या जन्माच्यावेळी नकुलचे माझ्यासोबत असणे. जे दापंत्य म्हणून ही १५ मिनिटे आमच्या आयुष्यातील सर्वात अमूल्य होते. मला माहिती आहे की कोविड १९ च्या नियमांनुसार ऑपरेशन थिएटरमध्ये नकुलला तिथे थांबण्याची परवानगी नव्हती. परंतु सूर्या हॉस्पिटलआणि डॉ. अवस्थीने आम्हाला याची परवानगी दिली, त्याबद्दल मी त्यांची आभारी आहे.' त्याच्या जन्मामुळे आम्ही स्वतःला ही विसरलो जानकीने या पोस्टमध्ये पुढे लिहिले आहे, 'सूफी जेव्हा या जगात आला तेव्हा आजूबाजूचे सारे काही आम्ही विसरून गेलो. या क्षणामध्ये आम्ही दोघेही इतके हरवून गेलो की, तो आल्याची बातमी आमच्या जवळच्या लोकांना द्यायलाही काही वेळ विसरून गेलो. ही बातमी सर्वप्रथम कुणाला सांगायची हेच कळत नव्हतं. मग आण्ही माझ्या आईवडिलांना आणि नकुलच्या आईला कॉन्फरन्स कॉल केला. मी त्या कॉलचा स्क्रीन शॉट काढला आहे आणि जेव्हा सूफी मोठा होईल, तेव्हा आम्हाला हे सारे त्याला दाखवता येणार आहे. '


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3nGcGfQ