Full Width(True/False)

अभिलाषा पाटील यांचं करोनाने निधन, 'छिछोरे'त केली होती भूमिका

मुंबई- करोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर वाढतच चालला आहे. रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आरोग्य यंत्रणा शर्थीचे प्रयत्न करत आहेत. बॉलिवूडमधील कित्येक कलाकारांना करोनाची लागण झाली आहे. कित्येकांनी करोनावर मात केली तर काहींना आपले जीव गमवावे लागले. नुकतंच अभिनेत्री यांचं करोनामुळे निधन झालं आहे. त्यांच्या निधनाने मराठी चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. अनेक मराठी कलाकारांनी त्यांच्या जाण्याचं दुःख व्यक्त केलं आहे. अभिलाषा एक उत्तम अभिनेत्री होत्या. काही दिवसांपूर्वी कामानिमित्त अभिलाषा वाराणसीला गेल्या होत्या. तिथे अभिलाषा यांना ताप येत असल्याने त्या मुंबईत परतल्या. चाचणी केल्यावर ती पॉझिटिव्ह आल्याने त्या इस्पितळात दाखल झाल्या. मागील चार दिवस अभिलाषा आयसीयूमध्ये होत्या. अभिलाषा मृत्युसोबतची झुंज जिंकू शकल्या नाहीत. ४ मे रोजी त्यांनी अखेचा श्वास घेतला. अभिनेत्री पल्लवी पाटीलने सोशल मीडियावर यासंबंधी पोस्ट करत दुःख व्यक्त केलं आहे. अभिलाषा यांनी 'बापमाणूस' मालिकेत पल्लवीच्या आईची भूमिका साकारली होती. आई होतीस तू माझी, असं म्हणत पल्लवीने तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत. अभिनेता अतुल तोडणकरने देखील अभिलाषा यांच्या जाण्याचं दुःख व्यक्त केलं आहे. अभिलाषा यांनी 'छिछोरे' चित्रपटात डॉक्टरची भूमिका साकारली होती. त्याशिवाय त्या 'बायको देता का बायको', 'मलाल', 'प्रवास' यांसारख्या चित्रपटांमध्ये झळकल्या होत्या. प्रतिभावंत कलाकाराच्या निधनामुळे मराठी कलाविश्वात हळहळ व्यक्त होत आहे. पल्लवी पाटील, संजय कुलकर्णी यांसारख्या कलाकारांनी सोशल मीडियाद्वारे अभिलाषा यांना श्रद्धांजली वाहिली आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/33emNza