Full Width(True/False)

'रामयुग' वेब सीरिजचा ट्रेलर पाहून प्रेक्षकांनी दिल्या संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...

मुंबई: बॉलिवूड चित्रपट 'हम तुम' फेम दिग्दर्शक यांची आगामी वेब सीरिज '' लवकरच मॅक्स प्लेयरवर रिलीज होणार आहे. नुकताच या वेब सीरिजचा ट्रेलर रिलीज झाला आहे. ही वेब सीरिज रामायणावर आधारित आहे. पण या वेब सीरिजचा ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस पडलेला नाही. अनेकांनी या ट्रेलरची तुलना रामानंद सागर यांच्या'रामायण'शी केली असून कोणीही त्यांच्याशी स्पर्धा करू शकत नसल्याचं म्हटलं आहे. या ट्रेलरवर अनेक युझर्सनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. रामयुग ही वेब सीरिज रामायणावर आधारित आहे. बाहुबली चित्रपटाप्रमाणे यातही अनेक व्हीएफएक्स इफेक्ट वापरण्यात आले आहेत. मात्र यातील बऱ्याच व्यक्तिरेखांवर आणि दृश्यांवर आक्षेप घेतला आहे. या ट्रेलरवर अनेक युझर्सनी टीका केली आहे. या ट्रेलरवर अनेक संतप्त टीकांचा पाऊस पडला आहे. एका युझरनं लिहिलं, रामानंद सागर यांचा रामायण शो सर्वात उत्तम होता. त्याची स्पर्धा कोणीच करू शकत नाही. आजही इतक्या वर्षांनंतर त्या शोची लोकप्रियता अजिबात कमी झालेली नाही. काही युझर्सनी या वेब सीरिजच्या व्यक्तीरेखांच्या लुकवरही टीका केली आहे. रामायणातील व्यक्तीरेखा देवांप्रमाणे कशा भासायच्या आणि या वेब सीरिजमधील व्यक्तीरेखांमध्ये काय कमी आहे हे अनेक युझर्सनी दाखवून दिलं आहे. तर काही युझर्सनी यावर सरकारनं बंदी घालावी अशी मागणी देखील केली आहे. 'रामयुग' वेब सीरिजचे एपिसोड येत्या ६ मे ला मॅक्स प्लेअरवर रिलीज होणार आहेत. या वेब सीरिजमध्ये विवान भटेना यांनी हनुमंताची भूमिका साकारली आहे. तर टिस्का चोपड़ा, दिलीप ताहिल, अनुप सोनी, दिगंत मनचले, ऐश्वर्या ओझा या कलाकारांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3t6L2tv