मुंबई : आपल्या आयुष्यात संगीताचे महत्त्वाचे स्थान आहे. सिनेमांचा इतिहास शंभर वर्ष जुना आहे परंतु संगीताचा इतिहास शंभर वर्षांहून जास्त जुना आहे. आपल्याकडे आवडीने गाणी ऐकली जातात, इतकेच नाही तर गुणगुणलीही जातात. मग ती सिनेमाची गाणी असतात तर कधी मालिकांची गाणी असतात. काही मालिकांची गाणी इतकी लोकप्रिय होतात की ती मालिका संपल्यानंतरही प्रेक्षकांच्या मनात ती रुंजी घालतात. एका काळ असा होता की, टीव्हीवर मालिकांचे गाणे सुरू झाले की महिला प्रेक्षक आपल्या हातातील कामे सोडून ती मालिका पाहण्यासाठी येऊन बसायच्या. हे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल, परंतु हे खरे आहे. अशा काही मालिका होत्या की त्या मालिकांप्रमाणेच त्याची गाणीही लोकप्रिय होती. अशाच काही मालिका आणि त्याच्या गाण्यांबद्दल जाणून घेऊ या... 'कसौटी जिंगदी की' ही मालिका कमालीची लोकप्रिय झाली होती. एकता कपूरची निर्मिती असलेल्या या मालिकेने प्रेक्षकांच्या विशेषतः महिला प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान तयार केले होते. या मालिकेतील अनुराग आणि प्रेरणा या व्यक्तीरेखा खूपच लोकप्रिय झाल्या होत्या. या दोघांमधील प्रेम दाखवणारे संगीतही खूप लोकप्रिय झाले होते. प्रेक्षकांनाही हे गाणी खूप आवडले होते. हे गाणू बाबुल सुप्रियो आणि प्रिया भट्टाचार्यने गायले होते. कहानी घर घर की या मालिकेचे गाणे जेव्हा सुरू व्हायचे तेव्हा महिला प्रेक्षक हातातली कामे बाजूला सारून ती मालिका पहिल्यापासून बघण्यासाठी टिव्हीसमोर येऊन बसायच्या. ही मालिका देखील एकता कपूरचीच होती. या मालिकेसोबतच प्रेक्षकांना हे गाणे खूप आवडले होते. हे गाणे प्रिया भट्टाचार्यने गायले होते. क्योंकि सास भी कभी बहू थी तुलसी ही व्यक्तिरेखा घराघरात पोहोचवणारी मालिका होती. ही मालिका प्रेक्षकांमध्ये खूपच लोकप्रिय झाली होती. मालिकेसोबत त्याचे टायटल साँगही खूपच लोकप्रिय झाले होते. या मालिकेतील तुलसी ही व्यक्तिरेखा आताच्या केंद्रीय मंत्री स्मृती ईराणी यांनी साकारली होती. या मालिकेचे टायटल साँगही प्रिया भट्टाचार्यने गायले होते. कुमकुम- एक प्यारा सा बंधन ही मालिका दुपारी प्रसारित व्हायची. त्यामुळे मालिकेच्या आधी घरातील सर्व कामे संपवून महिला प्रेक्षक ही मालिका पाहण्यासाठी टीव्ही समोर येऊन बसायच्या. या मालिकेनेही अनेक वर्षे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले होते. या मालिकेचे टायटल ट्रॅकही प्रेक्षकांना खूप आवडले होते. मालिकेचे हे गाणे सोनू निगम आणि पामेला जैन यांनी गायले होते. ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेचे टायटल ट्रॅक खूपच लोकप्रिय आहे. परंतु यातील भक्ती गीत अधिक लोकप्रिय आहे. या गाण्यातून या मालिकेची नायिका अक्षरचे भगवान कृष्णप्रती प्रेम आणि समर्पण व्यक्त करते. या मालिकेतील अक्षरा ही प्रमुख भूमिका साकारणारी हिना खानचे अतिशय आवडते गाणे होते. टायटल ट्रॅकचे गाणे अलका याज्ञिक, पामेला जैन, नवीन त्रिपाठी आणि जावेद अलीने गायले होते. तर 'ओ कान्हा मुली की मधुर सुना दो' हे गाणे रुनझुने गाये होते. या मालिकेतील 'दिल से बंधी एक डोर' हे आणखी एक गाणे महिला प्रेक्षकांमध्ये खूपच लोकप्रिय झाले होते. जोधा अकबर ही मालिकाही खूपच लोकप्रिय झाली होती. या मालिकेतील गाणे 'इन आँखो में तुम' खूपच लोकप्रिय झाले होते. हे गाणे श्रेया घोषाल हिने गायले होते. हे गाणे आजही तितक्याच आवडीने ऐकले जात असून युट्यूबवर या गाण्याला एक मिलियनहून अधिकवेळा ऐकण्यात आले आहे. नामकरण या मालिकेतील लॉरी गाणे खूपच लोकप्रिय झाले होते. हे गाणे पलक मुच्छलने गायले होते. हे गाणी एका मुलीने आपल्या आईबद्दल तिच्या मनात असलेले प्रेम आणि आदर व्यक्त करण्यासाठी गायले आहे. तसेच आपल्या आईच्या अडचणी, तिचे दुःख सोडवण्यासाठी आणि तिला हसवण्यासाठी मुलीची धडपड अतिशय सुंदर पद्धतीने दर्शवली आहे. सत्यमेव जयते आमिर खानचा रिअॅलिटी शो असलेला 'सत्यमेव जयते' हा कार्यक्रम. यातून देशभक्ती आणि राष्ट्रवाद दाखवण्यात आला. देशातील समस्या यातून मांडल्या होत्या. हा कार्यक्रम खूपच लोकप्रिय झाला होता. याचे गाणेही खूप लोकप्रिय झाले होते. हे गाणे किर्ती सांगठिया आणि राम संपत यांनी गायले होते.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3c0cbbU