मुंबई : मराठी अभिनेता आणि निर्माता म्हणून ओळखले जाणा-या यांनी सलमान खानच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ' ' या सिनेमात काम केले आहे. परंतु प्रवीणची भूमिका लहान असल्याने त्यांचे चाहते खूपच नाराज झाले आहेत. चाहत्यांची ही नाराजी लक्षात घेऊन प्रवीण तरडे यांनी त्यांची अशी समजूत घातली आहे. काय म्हणाले प्रवीण तरडे सलमान खानचा बहुचर्चित असा 'राधे...' सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला. या सिनेमाचे पोस्टर आणि ट्रेलर जेव्हा प्रदर्शित झाले होते तेव्हा त्यामध्ये प्रवीण तरडे आणि सिद्धार्थ जाधव हे दोन मराठमोळे अभिनेते दिसले होते. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांना या सिनेमाबद्दल खूपच उत्सुकता होती. आपले लाडके कलाकार या सिनेमात कोणती भूमिका करत आहेत, हे पाहण्यासाठी त्यांचे चाहते आतुर होते. सिनेमा प्रदर्शित झाल्यावर त्यातील प्रवीण तरडे यांची अतिशय छोटी भूमिका पाहून त्यांचे चाहते खूपच नाराज झाले. त्यांनी आपली नाराजी सोशल मीडियावर व्यक्तही केली होती. आपल्या चाहत्यांची ही नाराजी लक्षात घेऊन त्यावर प्रवीण तरडे यांनी एका मुलाखतीत स्पष्टीकरण देत म्हटलं की, ' मला सलमान खानसोबत चांगले संबंध निर्माण करायचे होते. त्यामुळे त्यांच्या सिनेमात काम करायचे होते. मग ही भूमिका लहान आहे का मोठी याने मला फरक पडत नाही. मला त्यांच्यासोबत काम करणे महत्त्वाचे होते. ते यामुळे साध्य झाले.' याच मुलाखतीमध्ये पुढे ते म्हणाले, ' मराठी सिनेमांची पटकथा ही हिंदी सिनेमांपेक्षा जास्त दर्जेदार असते.' प्रवीण तरडे यांनी 'मुळशी पॅटर्न' या सिनेमाचे दिग्दर्शन केले होते आणि त्याचा रिमेक करणार आहे. या सिनेमाचे नाव ' अंतिम- द फायनल ट्रूथ' असे असेल. या सिनेमामध्ये सलमान खान आणि त्याचा मेव्हणा आयुष शर्मा मुख्य भूमिका साकारणार आहेत.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3fvVK9F