Full Width(True/False)

स्वस्त स्मार्टफोन भारतात लाँच, फोनची किंमत फक्त ३ हजार ८९९ ₹

नवी दिल्ली : ने स्वस्त itel A23 Pro ला भारतात लाँच केले आहे. फोनची किंमत ४,९९९ रुपये आहे, मात्र स्पेश डिस्काउंटसह फोन ३,८९९ रुपयात खरेदीसाठी उपलब्ध आहे. लाँच ऑफऱ अंतर्गत फोनवर १,१०० रुपये डिस्काउंट दिला जात आहे. फोनला जिओसोबतच्या भागीदारी अंतर्गत लाँच करण्यात आले आहे. ग्राहक फोनच्या खरेदीवर जिओच्या २४९ रुपयांपेक्षा अधिकच्या रिचार्जवर ३००० रुपयांपर्यंतच फायदा घेऊ शकतात. ग्राहकांना वरुन स्थानिक फ्लाइट बुकिंगसाठी पहिल्या बुकिंगवर १,५०० रुपये सूट मिळेल. वरून पहिल्यांदा बस बुकिंगवर १० टक्के सूट दिली जाईल. सोबत पहिल्यांदा ट्रेन तिकिट बुक केल्यास ४० टक्के सूट मिळेल. फोनवरून पहिल्यांदा कॅब बुकिंगवर ५ टक्के सूट मिळेल. वाचा : स्पेशल फोन आहे itel A23 Pro एक जिओ एक्सक्लूसिव्ह फोन असून, जो ड्युअल सिम कनेक्टिव्हिटीसोबत येतो. फोनमध्ये प्रायरी सिम म्हणून जिओचा वापर करावा लागेल. जिओच्या २४९ रुपयांपेक्षा अधिकच्या रिचार्जद्वारे फोनचे सर्व फीचर्स वापरता येतील. दुसऱ्या सिम स्लॉटमध्ये अन्य टेलिकॉम कंपनीचे सिम वापरता येईल. वाचा : स्पेसिफिकेशन्स itel A23 Pro स्मार्टफोनमध्ये ५ इंचचा मोठा डिस्प्ले देण्यात आला आहे, यात FWVGA ब्राइट डिस्प्ले सपोर्ट मिळेल. याद्वारे व्हिडीओ कॉलिंग, चित्रपट पाहण्याचा आनंद घेण्यासोबतच ऑनलाइन शिक्षणासाठी याचा उपयोग होईल. फोनमध्ये स्मार्ट फेस-अनलॉकचा सपोर्ट मिळेल. याच्या मदतीने फोन ०.२ सेकंदात अनलॉक होईल. फोन ४जी डाउनलोडिंग सपोर्टसह येते. यात अँड्राइड Go Edition सपोर्ट मिळतो. फोनमध्ये 1.4GHz क्वाड कोर प्रोसेसर सपोर्ट मिळेल. यात १ जीबी रॅम आणि ८ जीबी स्टोरेज देण्यात आले आहे. स्टोरेजला ३२ जीबीपर्यंत वाढवता येईल. फोटोग्राफ्रीसाठी यात २ मेगापिक्सलचा रियर कॅमेरा आणि VGA सेल्फी कॅमेरामिळेल. फोन प्रीमियम आणि स्लीक डिझाइनमध्ये येतो. पॉवरसाठी यात २४००mAh बॅटरी देण्यात आली आहे. फोनमध्ये पॉवर सेव्हिंग मोड फीचर देखील मिळेल. वाचा : वाचा : वाचा :


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3bUoVRf