नवी दिल्ली : रिलायन्स यूजर्सची संख्या गेल्या काही महिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढली हे. इतर टेलिकॉम कंपन्यांच्या तुलनेत कंपनीने मोठा यूजर बेस तयार केला आहे. कंपनी जिओ फोनच्या ग्राहकांसाठी वेगवेगळ्या रिचार्ज प्लानवर ऑफर देत आहे. तुम्ही जिओ फोनमध्ये अधिक डेटा वापर असाल तर कंपनीचे डेटा अॅड-ऑन प्लान्स देखील आहेत. या प्लानमध्ये मात्र कोणतीही कॉलिंग आणि एसएमएस सुविधा मिळत नाही. कंपनीचे हे प्लान 22 रुपयांपासून सुरू होतात. हे प्लान्स कोणते आहेत पाहुयात. वाचाः २२ रुपयांचा डेटा अॅड-ऑन प्लान जिओ फोनच्या २२ रुपयांच्या प्लानचा कालावधी २८ दिवस आहे. यात २ जीबी डेटा मिळतो. हा डेटा समाप्त झाल्यानंतर स्पीड कमी होऊन ६४ Kbps पर्यंत राहतो. ५२ रुपयांचा जिओ फोन डेटा अॅड-ऑन प्लान या प्लानची वैधता २८ दिवस असून, यात एकूण ६ जीबी डेटा मिळतो. हा डेटा समाप्त झाल्यानंतर स्पीड कमी होऊन ६४ Kbps पर्यंत मिळतो. वाचाः ७२ रुपयांचा जिओ फोन डेटा अॅड-ऑन प्लान या प्लानची वैधता २८ दिवस आहे. यात दररोज ०.५ जीबी यानुसार ग्राहकांना एकूण १४ जीबी डेटा मिळतो. डेटा समाप्त झाल्यानंतर स्पीड कमी होऊन ६४ Kbps मिळतो. १०२ रुपयांचा जिओ फोन डेटा अॅड-ऑन प्लान १०२ रुपयांच्या या प्लानचा कालावधी २८ दिवस असून, यात दररोज १ जीबी डेटा ग्राहकांना मिळतो. म्हणजेच या प्लानमध्ये ग्राहकांना एकूण २८ जीबी डेटा मिळेल. डेटा समाप्त झाल्यानंतर इंटरनेट स्पीड कमी होऊन ६४ Kbps मिळतो. १५२ रुपयांचा जिओ फोन डेटा अॅड-ऑन प्लान या प्लानचा कालावधी देखील २८ दिवस असून, यात दररोज २ जीबी डेटा या हिशोबाने एकूण ५६ जीबी डेटा मिळतो. डेटा समाप्त झाल्यानंतर इंटरनेट स्पीड कमी होऊन ६४ Kbps मिळेल. वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2Tpi9fX