Full Width(True/False)

मस्तच! 200W फास्ट चार्जिंगने फक्त ८ मिनिटात फुल चार्ज होणार स्मार्टफोन

नवी दिल्लीः चीनची स्मार्टफोन निर्माता कंपनी शाओमीने आपल्या युजर्संची सुविधा आणि अन्य टेक कंपन्यांना जोरदार टक्कर देण्यासाठी हायपर चार्ज सिस्टम वरून पडदा हटवला आहे. कंपनीचा दावा आहे की, या वायर फास्ट चार्जिंग सिस्टमवरून 4,000mAh च्या बॅटरीचा स्मार्टफोन फक्त ८ मिनिटात फुल चार्ज केला जाऊ शकतो. तर 4,000mAh च्या बॅटरीचा फोन 120W वायरलेस चार्जिंगने फक्त १५ मिनिटात फुल चार्ज होणार आहे. कंपनीचा हायपर चार्ज सिस्टम एक डेमो आहे. या सिस्टमला लवकरच अधिकृतपणे लाँच केले जाऊ शकते. वाचाः Xiaomi ची 100W फास्ट चार्जिंग टेक्नोलॉजी शाओमीने दोन वर्षापूर्वी १०० वॉट फास्ट चार्जिंग टेक्नोलॉजी आणली होती. त्या दरम्यान कंपीने म्हटले होते की, ही टेक्नोलॉजी 4,000mAh च्या बॅटरी स्मार्टफोनला फक्त १७ मिनिटात फुल चार्ज करते. वाचाः Oppo ची VOOC चार्जिंग टेक्नोलॉजी शाओमी शिवाय, ओप्पोचीही फास्ट चार्जिंग टेक्नोलॉजी उपलब्ध आहे. गेल्या वर्षी कंपनीने फास्ट चार्जिंग टेक्नोलॉजीवरून पडदा हटवला होता. त्या दरम्यान कंपनीने दावा केला होता की, त्यांची 125W फास्ट चार्जिंग टेक्नोलॉजी 4,000mAh ची बॅटरी फोनला फक्त २० मिनिटात चार्ज करते. वाचाः Redmi Note 10 Pro शाओमीने काही दिवसाआधी Redmi Note 10 Pro ला भारतीय बाजारात लाँच केले होते. या स्मार्टफोनची सुरुवातीची किंमत १५ हजार ९९९ रुपये आहे. या फोनमध्ये ६.६ इंचाचा सुपर अमोलेड फुल एचडी डिस्प्ले दिला आहे. यात फिंगरप्रिंट स्कॅनर, डबल टॅप जेस्चरचा सपोर्ट दिला आहे. फोनमध्ये Qualcomm Snapdragon 732G मोबाइल प्लेटफॉर्मचा वापर करण्यात आला आहे. तसेच ग्राफिक्स साठी Adreno 618 GUP देण्यात आले आहेत. हा फोन अँड्रॉयड ११ बेस्ड MIUI 12 वर काम करतो. वाचाः रेडमीच्या या स्मार्टफोनमध्ये रियर मध्ये क्वॉड कॅमेरा सेटअप दिला आहे. याचा प्रायमरी कॅमेरा ६४ मेगापिक्सलचा आहे. याशिवाय, ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल लेन्स, ५ मेगापिक्सलचा मायक्रो लेन्स आणि २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सरचा सपोर्ट मिळतो. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी यात २० मेगापिक्सलचा लेन्स दिला आहे. वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3g09FU6