मुंबई: अभिनेत्री निक्की तांबोळीच्या भावाचं ४ मे रोजी करोना व्हायरसच्या संक्रमणानं निधन झालं. या धक्क्यातून निक्की आणि तिचे कुटुंबीय अद्याप सावरलेले नाहीत अशातच आता निक्कीनं भावाचं स्वप्न पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे आणि त्यासाठी ती भावाच्या निधनानंतर २ दिवसांतच ''च्या शूटिंगसाठी रवाना झाली आहे. निक्कीसाठी हा सर्वात कठीण काळ आहे. पण तिच्या भावाचं स्वप्न होतं की, निक्कीनं 'खतरों के खिलाडी' या शोमध्ये सहभागी व्हावं. त्यासाठी आता निक्कीनं तयारी सुरू केली होती. त्यानंतर आता निक्कीनं निर्णय घेतला आहे की, ती काहीही झालं तरी भावाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी या शोमध्ये सहभागी होणार आहे. निक्की ६ मे केप टाऊनला रवाना होत आहे. निक्की तांबोळीनं सोशल मीडियावर एक पोस्ट करत याची माहिती दिली. यावेळी ती खूप भावुक झालेली दिसली. तिच्या या पोस्टमध्ये तिच्या वेदना आणि दुःख समजून येतं. तिनं इन्स्टाग्रामवर 'खतरों के खिलाडी ११'च्या ड्रेसमधील आपले फोटो अपलोड करत एक लांबलचक पोस्ट लिहिली आहे. आपल्या पोस्टमध्ये निक्कीनं लिहिलं, 'आज मी माझ्या आयुष्यातील अशा वळणावर आहे. जिथे माझे कुटुंबीय माझ्या भावाच्या निधनाच्या धक्क्यातून सावरण्याचा प्रयत्न करत आहेत आणि दुसरीकडे मला त्यांना सोडून कामासाठी जाणं गरजेच आहे. एकीकडे मी माझ्या करिअरच्या सर्वात मोठ्या वळणावर आहे. करिअर किंवा कुटुंब यातलं एक निवडायचं असेल तर माझ्यासाठी माझं कुटुंब सर्वात आधी आहे. पण माझ्या वडिलांनी मला सांगितलं की, जा तुझी स्वप्न जग आणि त्यांना पूर्ण कर. माझ्यावर विश्वास ठेव तू तुझी स्वप्न पूर्ण करत आहेस हे पाहून तुझ्या भावाला सर्वाधिक आनंद होईल.' निक्कीनं पुढे लिहिलं, 'मला माहीत आहे की माझं कुटुंब आणि माझ्या भावासाठी लाखो लोक प्रार्थना करत आहेत. मी माझ्या भावाच्या आशीर्वादनं सर्व यश संपादन करेन. माझी इच्छा होती की, माझा भाऊ रुग्णालयातून परत येईल आणि मला 'खतरों के खिलाडी ११'मध्ये पाहू शकेल. पण असं झालं नाही. त्याचं स्वप्न होतं की, मी या शोमध्ये सहभागी व्हावं आणि मी त्याचं हे स्वप्न पूर्ण करणार आहे. तो मला जिथे असेल तिथून पाहून खूश असेल. माझ्या भावाच्या आनंदसाठी मी माझ्या वेदनांशी लढत आहे.' निक्की तांबोळीच्या भावाला २-३ आठवड्यांपूर्वीच लंग्स कोलॅप्स झाल्यानं रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर त्याला करोना, टीबी आणि निमोनिया या आजारांचं निदान झालं. डॉक्टरांच्या अनेक प्रयत्नांनतरही त्याचा जीव वाचू शकला नाही आणि ४ मे रोजी त्यानं उपचारांदरम्यान शेवटचा श्वास घेतला.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3y3IYX8