नवी दिल्लीः टेक्नो कंपनीने गेल्या महिन्यात ग्लोबल मार्केट मध्ये टेक्नो स्पार्क ७ प्रो स्मार्टफोन लाँच केला होता. आता टेक्नो कंपनीने या स्मार्टफोनला भारतात २५ मे रोजी लाँच करणार आहे. स्पार्क ७ प्रमाणे स्पार्क ७ प्रो ला अॅमेझॉन इंडियावरून आता खरेदी करता येऊ शकणार आहे. वाचाः Tecno Spark 7 Pro फीचर्स टेक्नो स्पार्क प्रो मध्ये ६.६ इंचाचा पंच होल डिस्प्ले दिला आहे. एलसीडी स्क्रीनमध्ये ९० हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि फुल एचडी प्लस रिझॉल्यूशन दिले आहे. फोनमध्ये पुढच्या साईडला ८ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला आहे. स्पार्क ७ प्रो मध्ये एक व्हर्टिकल कॅमेरा सिस्टम आहे. ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी, एक डेप्थ असिस्ट लेन्स आणि एक एआय सेन्सर दिला आहे. फोन अँड्रॉयड ११ OS बेस्ड HiOS 7.5 सोबत येते. स्पार्क ७ प्रो मध्ये हीलियो G80 चिपसेट आणि 6GB पर्यंत रॅम दिले आहे. फोनमध्ये १२८ जीबी पर्यंत इनबिल्ट स्टोरेज दिले आहे. जे मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने वाढवता येऊ शकते. वाचाः टेक्नो स्पार्क 7 प्रो ला पॉवर देण्यासाठी 5000mAh बॅटरी दिली आहे. १० वॉट चार्जिंग सपोर्ट करतो. फोनमध्ये रियर वर फिंगरप्रिंट स्कॅनर दिले आहे. कनेक्टिविटीसाठी हँडसेट मध्ये ड्यूल ४ जीबी VoLTE, वाय-फाय, ब्लूटूथ, जीपीएस, मायक्रो-यूएसबी आणि 3.5 एमएम ऑडियो जॅकसारखे फीचर्स दिले आहेत. या फोनला ब्लू, स्प्रॉस ग्रीन आणि मॅग्नेट ब्लॅक कलर मध्ये येते. टेक्नो स्पार्क 7 प्रो देशात गेल्या महिन्यात लॉन्च झालेल्या टेक्नो स्पार्क 7 चे अपग्रेडेड वेरियंट आहे. टेक्नो स्पार्क ७ चे २ जीबी प्लस ३२ जीबी स्टोरेज व्हेरियंटला देशात ६ हजार ९९९ रुपये तर ३ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेज व्हेरियंटला ७ हजार ९९९ रुपयात खरेदी करू शकता. टेक्नो स्पार्क ७ प्रो ला ८ हजार ९९९ रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत लाँच केले जाऊ शकते. वाचा : वाचा : वाचा : वाचा :
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3bJzbf8