Full Width(True/False)

दिशा पाटनीसोबत कशी आहे बॉण्डिंग, जॅकी श्रॉफ म्हणाले...

मुंबई: बॉलिवूड अभिनेता सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. लवकरच ते दिशा पाटनीसोबत सलमान खानच्या 'राधे: युअर मोस्ट वॉन्टेड भाई' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. मागच्या काही वर्षांपासून टायगर श्रॉफला डेट करत असल्याचं बोललं जात. अर्थात या दोघांनीही आपलं नातं सर्वांसमोर मान्य केलेलं नाही पण दिशाचं टायगरच्या कुटुंबीयांशी खास बॉण्डिंग आहे. चित्रपटाच्या रिलीज आधी एका मुलाखतीत दिशासोबतच्या बॉण्डिंगबद्दल जॅकी श्रॉफ यांना प्रश्न विचारण्यात आला होता. ज्यावर त्यांनी दोघांमधील बॉण्डिंग कसं आहे हे स्पष्ट केलं. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत दिशासोबतच्या बॉण्डिंगबद्दल बोलताना जॅकी श्रॉफ म्हणाले आम्हा दोघांमध्ये तसं काही फारसं खास असं बॉण्डिंग नाही आहे. मी माझ्या कामात असतो, ती तिच्या कामात बिझी असते. कुठे या सर्व गोष्टी आणि आजकालची मुलं स्मार्ट आहेत त्यांना तुम्ही सल्ला देण्याची गरज नसतेच त्यांनी बऱ्याच गोष्ट स्वतःहून आत्मसात केलेल्या असतात. आता आपण जे झूम झूम करतोय ना ते त्यांनी शालेय वयात पाहिलेलं असतं. दरम्यान दिशा पाटनी आणि जॅकी श्रॉफ यांचा मुलगा २०१६ पासून रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा सुरू आहेत. दोघंही एकमेकांच्या कुटुंबीयांसोबत टाइम स्पेंड करताना दिसतात. अनेकदा टायगर, त्याची बहीण कृष्णा आणि दिशा एकत्र फिरताना, लंच किंवा डिनर करताना स्पॉट झालेले आहेत. याशिवाय दिशा पाटनी आणि टायगरची आई आयशा श्रॉफ यांच्यातही चांगलं बॉण्डिंग असल्याचं पाहायला मिळतं. टायगरची बहीण कृष्णा श्रॉफ आणि दिशा तर एकमेकींच्या चांगल्या मैत्रिणी आहेत. दोघीही अनेकदा एकमेकींसोबतचे फोटो किंवा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात. तसेच आपल्या पोस्टमध्ये एकमेकींना टॅग करताना दिसतात. दिशा पाटनीचा सोशल मीडियावर बराच मोठा चाहता वर्ग आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3uFIRyV