मुंबई- मराठी चित्रपटसृष्टीची अप्सरा असणारी हिने सोशल मीडियावर आपल्या लग्नाची घोषणा करून चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला. सोनालीने ७ मे रोजी दुबईत सोबत लग्नगाठ बांधली. वाढदिवसाच्या दिवशी ही गोड बातमी सांगत सोनालीने सगळ्यांना चकित केलं. चाहत्यांनी आणि इतर कलाकारांनी सोनालीवर शुभेच्छांचा वर्षाव केला. अनेकांनी तिला भावी आयुष्यासाठी आशीर्वाद दिले. अशातही काही ट्रोलर्स सोनालीला ट्रोल करण्याचा प्रयत्न करत होते. परंतु, सोनालीने सडेतोड उत्तर देत ट्रोलर्सची बोलती बंद केली. सोनालीने तिच्या ट्विटर हॅण्डलवर लग्नाची बातमी सांगितली. परंतु, तिला शुभेच्छा देण्याऐवजी एका युझरने तिला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. ट्रोलरने लिहिलं, 'मला वाटलं अमेरिकेत लग्न केलं असेल आणि लग्न दुबईत केलं म्हणजे मुलं तिथे होतील पण अशी शक्यता नाही.' युझरच्या या कमेंटवर भडकलेल्या सोनालीने त्याची चांगलंच सुनावलं. सोनालीने लिहिलं, 'तुम्हाला काहीही वाटू शकतं आणि तुम्ही आम्हाला काहीही बोलू शकता... हे आता खपवून घेणार नाही. किमान मी तरी नाही. समाजभान ठेवून वागणं, समाजाला देणं लागणं, देऊ करणं, जबाबदार नागरिक म्हणून वावरणं, माणुसकी जपणं ... हे सगळं आम्ही करायचं आणि तुम्ही फक्त बसून अशा फुकट कमेंट टाकायच्या.' अशा शब्दात सोनालीने युझरला सुनावलं आहे. यासोबतच एका युझरने सोनालीला करोनाग्रस्तांना मदत करण्याचा सल्ला दिला होता. त्यावरही युझरला सुनावत सोनालीने लिहिलं, 'खरंच? तुम्ही, आम्ही केलेली मदत पाहिली नाही म्हणून आम्ही काहीच केलं नाही किंवा काही करतच नाही असं होत नाही. मी काय मदत केलीये ते बोंबलून सांगणं मला तरी योग्य वाटत नाही. सगळ्यांना एकाच पठडीत बसवणं चुकीचं आहे.' तर एका कमेंटमध्ये सोनालीच्या दुबईच्या घराला महाल म्हटलं गेलं होतं. त्यावरही सोनालीने दिलेल्या उत्तराने सगळ्यांची मनं जिंकली आहेत. सोनालीने म्हटलं, 'राजमहाल... आम्हीच पाहिला नाहीये अजून. काय हे... काहीही सांगता राव... आमचा २BHK आहे, हो पण आम्ही सुखी, निरोगी आणि समाधानी आहोत. त्यामुळे आमच्यासाठी हाच आमचा महाल.'
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3f2Yf2S