Full Width(True/False)

सॅमसंगचा आणखी एक नवा स्मार्टफोन येतोय, जाणून घ्या डिटेल्स

नवी दिल्लीः सॅमसंगचा आणखी एक स्वस्त किंमतीचा स्मार्टफोन येत आहे. सॅमसंगचा हा नवीन एन्ट्री लेवल स्मार्टफोन कंपनीच्या Galaxy F Series अंतर्गत येत आहे. अनेक रिपोर्ट्सच्या माहितीनुसार, या इंडिया एक्सक्लूसिव सीरीज मध्ये पुढील मॉडल असू शकतो. गॅलेक्सी एफ २२ स्मार्टफोनवरून अनेक ट्विटर हँडलवरून ट्विट करण्यात आले आहे. यानंतर SamMobile ने आपल्या रिपोर्टमध्ये या फोनला कन्फर्म केले आहे. वाचाः Galaxy A22 वर बेस्ड असू शकतो नवीन स्मार्टफोन ट्विटच्या माहितीनुसार, सॅमसंगच्या या स्मार्टफोनचे मॉडल नंबर SM-E225F आहे. यावर आधीपासूनच काम करण्यात येत आहे. SamMobile च्या रिपोर्टमध्ये म्हटले की, स्मार्टफोन (गॅलेक्सी एफ22), Galaxy A22 वर बेस्ड असणार आहे. सॅमसंग गॅलेक्सी ए २२ ची अजून घोषणा करण्यात आली नाही. कारण, Galaxy F मॉडल्स Galaxy A आणि Galaxy M स्मार्टफोन्स चे रीबेज्ड व्हर्जन असणार आहे. वाचाः गॅलेक्सी एफ सीरीजचा पुढील स्मार्टफोन सॅमसंगने गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात भारतात आपली Galaxy F Series लाँच केली होती. कंपनीने या सीरीज अंतर्गत ऑक्टोबर मध्ये पहिला फोन Galaxy F41 लॉन्च केला होता. यानंतर कंपनीने फेब्रुवारी मध्ये सीरीजचा दुसरा स्मार्टफोन Galaxy F62 आणला होता. कंपनीने या वर्षी एप्रिल महिन्यात भारतात Samsung Galaxy F12 आणि Galaxy F02s स्मार्टफोन लाँच केले होते. आता लवकरच स्मार्टफोन आणण्याची तयारी केली जात आहे. वाचाः फोनमध्ये मिळू शकतो ४८ मेगापिक्सलचा मेन कॅमेरा SamMobile च्या रिपोर्ट मध्ये म्हटले की, Galaxy F22 स्मार्टफोन Galaxy A22 किंवा Galaxy A22 5G वर बेस्ड असू शकतो. सॅमसंग गॅलेक्सी A22 5G ला गेल्या महिन्यात गीकबेंच लिस्टिंग मध्ये स्पॉट केले होते. या स्मार्टफोनमध्ये MediaTek Dimensity 700 प्रोसेसर, ६ जीबी रॅम आणि अँड्रॉयड ११ ऑपरेटिंग सिस्टम सोबत पाहिले गेले आहे. सॅमसंग गॅलेक्सी A22 5G स्मार्टफोन मध्ये ६.५ इंचाचा डिस्प्ले आणि ३.५ एमएम ऑडियो जॅक दिला जाऊ शकतो. या स्मार्टफोनमध्ये ४८ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला जाऊ शकतो. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/33hs0WY