Full Width(True/False)

दीप्तिची दैदिप्यमान कामगिरी, मायक्रोसॉफ्टकडून २ कोटीची जॉब ऑफर

नवी दिल्लीः हैदराबादमधील एका मुलीने कमाल केली आहे. मायक्रोसॉफ्टने दीप्ति नारकुतीला २ कोटी रुपये वार्षिक पॅकेज दिले आहे. दीप्ति आता मायक्रोसॉफ्टमध्ये सॉफ्टवेयर इंजिनियर म्हणून काम करणार आहे. अमेरिकेत टेक जाएंटच्या हेडक्वॉर्टर Seattle मध्ये काम करणार आहे. दीप्ति नारकुतीने नुकतेच आपले पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण केले होते. तिने एमएस कम्प्यूटर्सचे शिक्षण यूनिवर्सिटी ऑफ फ्लोरिडामधून पूर्ण केले आहे. वाचाः कॅम्पस प्लेसमेंट दरम्यान इंट्रीव्यूअर्सला प्रभावित करण्यात दीप्तिला यश आले. मायक्रोसॉफ्ट शिवाय, दीप्तिला गोल्डमॅन सॅक्स आणि अॅमेझॉनकडून जॉब ऑफर आली आहे. परंतु, तिनं मायक्रोसॉफ्टला पसंती दिली आहे. वाचाः फ्लोरिडा विद्यापिठात जाण्याआधी तिने हैदराबादमधील उस्मानिया कॉलेज ऑफ इंजीनियरिंग मधून बीटेक पूर्ण केले होते. त्यानंतर ती अमेरिकेच्या निवेश बँक आणि आर्थिक सेवा कंपनी जेपी मॉर्गन मध्ये एक सॉफ्टवेयर इंजिनियर म्हणून काम केले होते. रिपोर्ट्सच्या माहितीनुसार, तिनी २०१४ ते २०१५ मध्ये मायक्रोसॉफ्ट स्टूडेंट असोसिएट म्हणून काम केले. दीप्तिचे वडील डॉ. वेंकन्ना हैदराबाद पुलिस कमिश्नरेट मध्ये फॉरेंसिक तज्ज्ञ आहेत. द हंस इंडियाच्या एका रिपोर्टनुसार, दीप्तिला फ्लोरिडा विद्यापीठात कॅम्पसमध्ये मुलाखती दरम्यान निवडलेल्या ३०० विद्यार्थ्यांपैकी सर्वात आकर्षक पॅकेज दिले आहे. तेलंगानाचे पोलीस महासंचालक (DGP) च्या अधिकृत ट्विटर हँडलवरून दीप्तिचे अभिनंदन केले आहे. एका पोस्टमध्ये म्हटले की, एन. दीप्ति, डी/ओ डॉ. वेंकन्ना गारू (आमचे फोरेंसिक तज्ज्ञ) ला हार्दिक शुभेच्छा. २ कोटी रुपयांचे वार्षिक पॅकेज सोबत #SoftwareDevelopmentEngineer @Microsoft, USA चे पद मिळाले आहे. या यशाबद्दल #TelanganaPoliceFamily कडून हार्दिक शुभेच्छा. हा आमच्यासाठी आनंदाचा क्षण आहे. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3hCxzaM