मुंबई- बॉलिवूड सोबतच हॉलिवूडमध्येही प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचणारी अभिनेत्री तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल नेहमीच चर्चेत असते. 'द हिरो: लव्ह स्टोरी ऑफ अ स्पाय' या चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणारी प्रियांका सध्या आपल्या वैवाहिक जीवनाचा आनंद घेत आहे. हॉलिवूड चित्रपटांमध्ये काम करताना प्रियांका सुप्रसिद्ध अभिनेता आणि गायक याच्या प्रेमात पडली आणि २०१८ साली विवाह बंधनात अडकली. परंतु, प्रियांकासाठी तिच्या घरातल्या सदस्यांनी आधीपासूनच मुलगा पाहून ठेवला होता हे तुम्हाला माहीत आहे का? एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत प्रियांकाने या गोष्टीचा खुलासा केला होता. प्रियांकाच्या घरातल्यांना वाटत होतं की तिने छोट्या पडद्यावरील अभिनेता याच्याशी लग्न करावं. प्रियंकाने मुलाखतीत म्हटलं, 'माझ्या मावशीला वाटत होतं की मी मोहित रैनाशी लग्न करावं. कारण तो तेव्हा 'देवों के देव महादेव' मालिकेत शंकर देवांची भूमिका साकारत होता. तिला वाटायचं तो टीव्हीवर जशी भूमिका करतो तसाच खऱ्या आयुष्यातदेखील आहे. तिला वाटायचं मोहित संस्कारी आणि प्रामाणिक आहे. शांत आहे. त्यामुळे मावशीच्या मते मोहित माझ्यासाठी अगदी परफेक्ट मॅच होता.' काही दिवसांनी प्रियांकाची ही मुलाखत सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली होती. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की ही गोष्ट मोहितला देखील नंतर माहीत पडली. जेव्हा मोहितला याबाबतीत विचारणा करण्यात आली तेव्हा त्याने मस्करी म्हटलं की, 'अरे आता काय करू शकतो? त्यांचं तर लग्न पण झालं.' देवों के देव महादेव' या मालिकेच्या वेळेस मोहित अभिनेत्री मौनी रॉयला डेट करत असल्याचं म्हटलं जात होतं. परंतु, काही काळानंतर मोहितने या सर्व अफवा असल्याचं स्पष्टीकरण दिलं होतं.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3uG0kqT