Full Width(True/False)

स्मार्टफोन चोरीला गेलाय? डोन्ट वरी ! घरी बसून 'असा' डिलीट करा सर्व डेटा

नवी दिल्ली . फोन हरविला किंवा चोरी गेल्यानंतर तो चुकीच्या हातात गेला तर डेटा वापरला जाऊ शकतो. याची काळजी अधिक असते. हे टाळण्यासाठी, Googleने आपल्या Android वापरकर्त्यांना फोन शोधण्याची आणि डेटा हटविण्यासाठी एक फिचर उपलब्ध करून दिले आहे. काही सोप्या टिप्सचा वापर करून तुम्ही सहजपणे मोबाईलमधील डेटा डिलीट करू शकता ते देखील मोबाईल तुमच्या जवळ नसताना. काय आहेत या टिप्स जाणून घ्या वाचा : अशा प्रकारे शोधता येईल स्मार्टफोन १. यासाठी आपल्याला फाइंड माय डिव्हाइस वेबसाइटवर जावे लागेल. २. स्मार्टफोनवर चालू असलेल्या आपल्या त्याच Google खात्यासह येथे लॉग इन करा. ३. एकदा लॉग इन झाल्यानंतर वेबसाइट आपला फोन शोधणे सुरू करेल. ४. वेबसाइट Google मॅप्स फोनचे शेवटचे स्थान दाखवेल . ५. इच्छा असेल तर मॅप्स वरील स्थानाची दिशा देखील पाहू शकता आणि फोनवर प्रवेश करू शकता. घरी बसून डिलीट करता येईल डेटा १. यासाठी आपल्याला फाइंड माय डिव्हाइस वेबसाइटवर जावे लागेल. २. येथे आपल्याला इरेज डिव्हाइसचा पर्याय दिसेल. ३. या पर्यायावर क्लिक करून पुष्टी करा. ४. Google खाते सत्यापित करा. ५. थोड्या वेळात फोन रीसेट करणे सुरू होईल आणि फोनचा डेटा देखील हटविला जाईल. ६. फोन सापडणार नाही हे आपल्याला माहित असेल तेव्हाच या पद्धतीचा वापर करा. वाचा : वाचा : वाचा :


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2RglZY5