नवी दिल्ली : अनेकदा आपल्याला इंटरनेटची आवश्यकता असल्यावर आपण दुसऱ्या व्यक्तीकडून वाय-फायद्वारे घेत असतो. यासाठी त्या व्यक्तीकडून आधी आपल्याला पासवर्ड घ्यावा लागतो. मात्र, अनेकदा पासवर्ड मोठा असल्याने चुकतो. जर तुम्हाला देखील तुमचा पासवर्ड दुसऱ्याला शेअर करायचे असेल व हा पासवर्ड मोठा आणि किचकट असल्यास आम्ही तुम्हाला शेअरिंगची सोपी पद्धत सांगणार आहोत. पद्धतीद्वारे सहज कोणासोबतही शेअर करू शकता व यासाठी पासवर्डची देखील लागणार नाही. वाचाः जर तुम्ही सॅमसंगचा फोन वापरत असाल तर तुमच्यासाठी ही ट्रिक अजूनच सोपी होईल. क्यूआर कोडच्या मदतीने तुम्ही सहज स्कॅन करून आपोआप नेटवर्कशी कनेक्ट करू शकता. तुम्ही जर गॅलेक्सी स्मार्टफोनमध्ये अँड्राइड ९ किंवा त्याच्या पुढील व्हर्जन वापरत असाल तर तुम्ही अवघ्या सेकंदात इंटरनेट शेअर करू शकाल. क्यूआर कोडद्वारे असे करा वाय-फाय सोबत कनेक्ट
- सर्वात प्रथम तुमच्या स्मार्टफोनच्या सेटिंग्समध्ये जा.
- येथे तुम्हाला कनेक्शन पर्यायावर क्लिक करावे लागेल. त्यानंतर वाय-फायवर जा.
- वाय-फायला WPA, WPA-PSK आणि WEP द्वारे सुरक्षित करणे गरजेचे आहे.
- ज्याच्यासोबत इंटरनेट शेअर करायचे या त्या डिव्हाइसशी वाय-फाय नेटवर्कद्वारे कनेक्ट करा.
- यानंतर कनेक्टेड नेटवर्कच्या डाव्या बाजूला दिलेल्या गियर आयकॉनवर टॅप करा.
- तुम्हाला स्क्रीनच्या खाली एक क्यूआर कोड टायटल असणारे आयकॉन दिसेल. यावर टॅप केल्यानंतर स्क्रीन आपोआप ब्राइट होईल.
- आता तुम्हाला क्यूआर कोड दिसेल, जे स्कॅन करून दुसरी व्यक्ती सहज इंटरनेट अॅक्सेस करू शकेल.
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3v1pMYa