Full Width(True/False)

माधुरी दीक्षित आणि जुही चावलाने नाही केलं अभिनेत्यासोबत लग्न, दोघींचीही कारणं आहेत अजब- गजब

मुंबई- बॉलिवूडमध्ये अशा अनेक जोड्या आहेत ज्यांनी आपल्या सहकलाकाराला आयुष्यभराचा जोडीदार म्हणून निवडलं. परंतु, ९० च्या दशकातील या लोकप्रिय अभिनेत्रींनी मात्र बॉलिवूड इण्डस्ट्रीबाहेरच्या व्यक्तींना आपला जोडीदार निवडून प्रेक्षकांना चकित केलं होतं. बॉलिवूडवर राज्य करणाऱ्या अभिनेत्री आणि यांनी एखाद्या बॉलिवूड अभिनेत्यासोबत लग्न न करता बॉलिवूड बाहेरच्या व्यक्तींसोबत लग्नगाठ बांधली. माधुरी आणि जुही यांनी त्यांच्या या निर्णयाचा खुलासा करण जोहरच्या कार्यक्रमात केला होता. माझा नवरा माझ्यासाठी हिरो आहे माधुरीने १९९९ साली डॉक्टर असलेल्या श्रीराम नेने यांसोबत विवाह केला तर जुहीने १९९५ साली बिसनेसमन जय मेहता यांच्यासोबत लग्नगाठ बांधली. २०१४ साली जेव्हा जुही आणि माधुरी यांनी 'कॉफी विथ करण' मध्ये हजेरी लावली तेव्हा करणने दोघींनाही एकच प्रश्न विचारला. करणने विचारलं, 'तुम्ही एवढ्या मोठमोठ्या अभिनेत्यांसोबत काम केलं मग त्यांपैकी एकासोबतही लग्नगाठ बांधावी असं तुम्हाला वाटलं नाही का?' त्यावर उत्तर देताना माधुरी म्हणाली, 'मी शाहरुख खान, सलमान खान सोबत खूप चित्रपट केले. आमिर खानसोबत दोनच चित्रपट केले परंतु, मला त्यांच्यापैकी एकही इतका आवडला नाही ज्याच्यासोबत मी लग्न करू शकेन. माझा नवराच माझ्यासाठी हिरो आहे.' मला अभिनेत्यासोबत लग्न करायचं नव्हतं तर करणच्या प्रश्नाला उत्तर देत जुहीने म्हटलं, 'मला जय मेहता यांनी आकर्षित केलं. ते माझ्यासाठी फुलं, ग्रीटिंग्स, भेटवस्तू पाठवायचे. माझ्याकडे त्या वस्तूंचा ढीग लागला होता. मी सगळ्या अभिनेत्यांचा मान ठेवते पण मला नाही वाटत मी स्वतःप्रमाणे आणखी एका व्यक्तीला सांभाळू शकली असती. आपण अभिनेते असलो की स्वतःमध्येच हरवलेले असतो. त्यामुळे मला अभिनेत्यासोबत लग्न करायचं नव्हतं.' जुही शेवटची 'एक लडकी को देखा तो ऐसा लगा' चित्रपटात दिसली होती. तर माधुरी 'कलंक' चित्रपटात झळकली होती. माधुरी लवकरच 'फाइंडिंग अनामिका' मध्ये दिसणार आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/34uK3th