मुंबई- छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम '' १० वर्ष उलटूनही प्रेक्षकांची अत्यंत आवडती मालिका आहे. परंतु, काही दिवसांपासून मालिकेतील कलाकारांमध्ये वाद झाल्याच्या चर्चा सोशल मीडियावर सुरू होत्या. मालिकेतील जेठालालचं पात्र रंगवणारे आणि टप्पूचं पात्र साकारणारा राज अनादकट यांच्यात भांडण झाल्याचं म्हटलं जातं होतं. दोघे एकमेकांशी बोलत नसल्याचं देखील सांगितलं जात होतं. परंतु, दिलीप यांनी या सगळ्या चर्चा केवळ अफवा असल्याचं म्हटलं आहे. एका वृत्तवाहिनीने या संबंधित अधिक माहिती मिळवण्यासाठी दिलीप यांच्यासोबत संपर्क केला. या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत दिलीप यांनी सगळ्या चर्चांचं खंडन करत म्हटलं, 'मला काळत नाही की, अशा सगळ्या अफवा कोण पसरवतं. हे सगळं साफ खोटं आहे. मी आणि राज एकमेकांसोबत खूप चांगल्या पद्धतीने वागतो. आमच्यात कशावरूनही वाद झालेले नाहीत. उगीचच सगळ्या अफवा पसरवल्या जात आहेत.' दिलीप यांनी अफवांना खोटं म्हटलं असलं तरीही राजने याबाबतीत कोणतंही स्पष्टीकरण दिलेलं नाही. एका वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, राजने मालिकेच्या चित्रीकरणासाठी दिलीप यांना एक तास वाट पाहायला लावली होती. दिलीप चित्रीकरणासाठी वेळेवर आले होते तर राजला यायला उशीर झाला होता. त्यांनतर त्यांच्यातील वाद विकोपाला गेला होता. दोघांनी एकमेकांना सोशल मीडिया माध्यमांवरूनही अनफॉलो केलं होतं. काही दिवसांपूर्वी दिलीप आणि शैलेश लोढा यांच्यामध्ये देखील वाद झाल्याच्या अफवा पसरवण्यात आल्या होत्या. शैलेश कार्यक्रमात तारक मेहता यांची भूमिका साकारतात.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3yL16VY