Full Width(True/False)

एअर इंडियाच्या सर्वरवर सायबर हल्ला, प्रवाशांचा पासपोर्टपासून क्रेडिट कार्डपर्यंतचा डेटा लीक

नवी दिल्लीः एअर इंडियासह जागतिक एअरलाइन्स कंपन्यांवर एक मोठा करण्यात आला आहे. या हल्ल्यात ४५ लाख युजर्संचा डेटा लीक झाला आहे. पासपोर्ट, क्रेडिट कार्डसह अनेक खास डेटा लीक करण्यात हॅकर्सला यश आले आहे. या हल्ल्यात ज्या एअरलाइन्सवर हल्ला करण्यात आला आहे. त्यात मलेशिया एअरलाइन्स, फिनएयर, सिंगापूर एअरलाइन्स, लुफ्थांसा आणि कॅथे पॅसिफिकचा समावेश आहे. वाचाः एअर इंडियाने आपल्या ग्राहकांना पाठवलेल्या मेसेज मध्ये म्हटले की, यात SITA Pss सर्वरवर सायबर हल्ला झाला आहे. ज्यात ग्राहकांची खासगी माहिती स्टोर केली जाते. तसेच यात माहिती प्रोसेस केली जाते. २६ ऑगस्ट २०११ ते २० फेब्रुवारी २०२१ पर्यंत स्टोरमधील माहिती लीक करण्यात आली आहे. वाचाः सायबर हल्ल्यात प्रवाशांचे नाव, जन्म तारीख, फोन नंबर, पासपोर्ट डिटेल्स, तिकीटाची माहिती, प्रवासाची माहिती, क्रेडिट कार्ड आदीची माहिती लीक करण्यात आली आहे. एअर इंडियाने म्हटले की, क्रेडिट कार्डच्या सीव्ही आणि सीवीवी नंबर्स या सर्वर मध्ये स्टोर करण्यात आले नव्हते. त्यामुळे प्रवाशांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. डाटा सुरक्षित करण्यासाठी तात्काळ पावलं उचलण्यात आली आहेत. या डाटा लीक प्रकरणी चौकशी सुरू आहे. यासाठी बाहेरील डाटा सेक्युरिटी तज्ज्ञांची मदत घेतली जात आहे. क्रेडिट कार्ड कंपन्यांना ग्राहकांचे पासवर्ड बदलण्याची सूचना देण्यात आली आहे. तसंच एअर इंडियाने नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पासवर्ड बदलण्यास सांगण्यात आलं आहे. वाचा : वाचा : वाचा :


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3bLjZhv