मुंबई: सलमान खानचा चित्रपट 'राधेः युअर मोस्ट वॉन्टेड भाई' रिलीज झाल्यापासून सोशल मीडियावर सातत्यानं चर्चेत आहे. प्रेक्षकांनी यावर संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी या चित्रपटाचं कौतुक केलंय तर काहींनी चित्रपटावर टीकाही केली आहे. पण आता सलमानचे वडील यांनी चित्रपटावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. आपल्या मुलाचा हा चित्रपट काही विशेष नसल्याचं सलीम खान यांचं म्हणणं आहे. एका हिंदी वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत सलमान खानचे वडील सलीम खान सलमानच्या 'राधे' चित्रपटाबाबत बोलताना म्हणाले, 'हा चित्रपट 'दबंग ३' पेक्षा खूपच वेगळा चित्रपट आहे. बजरंगी भाईजान उत्तम चित्रपटा होता आणि खूपच वेगळाही. पण 'राधे' काही विशेष खास चित्रपट नाही. पण कमर्शियल चित्रपटाची जबाबदारी असते की, प्रत्येकाला पैसे मिळावे. कलाकार, निर्माते आणि चित्रपटाशी संबंधित प्रत्येक व्यक्तीला केवळ पैसे हवे असतात. याप्रमाणे चित्रपटांची साखळी चालते आणि हा बिझनेस चालतच राहायला हवा. पैसा सर्वांनाच कमावायचा असतो. याचप्रमाणे सलमाननं परफॉर्म केलं. या चित्रपटाच्या स्टेकहोल्डर्सना फायदा झाला आहे. नाहीतर राधे काही विशेष खास असा चित्रपट अजिबात नाही.' सलीम खान पुढे म्हणाले, 'सध्या चित्रपटसृष्टीत सर्वात मोठी समस्या ही आहे की, चांगले लेखकच नाहीयेत. याच कारण हे आहे की, जे लेखक आहेत ते हिंदी किंवा उर्दू साहित्यच वाचत नाहीत. ते बाहेरून एखादी गोष्ट पाहतात आणि तेच खरं मानतात. भारतीय चित्रपटांमध्ये जंजीर हा चित्रपट गेम चेंजर होता. त्यानंतर चित्रपटसृष्टीला सलीम-जावेद रिप्लेसमेंट मिळालीच नाही. मग अशा परिस्थितीत तरी काय करणार.' सलमान खानचा राधे हा चित्रपट १३ मे रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये रिलीज झाला. तर भारतात हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म झी ५ वर रिलीज करण्यात आला होता. या चित्रपटाचं दिग्दर्शन प्रभूदेवानं केलं असून या चित्रपटात सलमान खानच्या व्यतिरिक्त दिशा पाटनी, रणदीप हुड्डा, जॅकी श्रॉफ आणि गौतम गुलाटी यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3bYU4TP