नवी दिल्लीः सरकारी टेलिकॉम कंपनी आपल्या ग्राहकांना खूष करण्यासाठी एक जबरदस्त ऑफर आणली आहे. संपूर्ण भारतात आपल्या प्रीपेड मोबाइल ग्राहकांसाठी १०० रुपयांच्या टॉपअपवर फुल टॉकटाइम ऑफर लाँच केली आहे. हा फुल टॉकटाइम ऑफर २० ऑगस्ट २०२१ पर्यंत सर्व टेलिकॉम सर्कलमध्ये बीएसएनएलच्या प्रीपेड मोबाइल ग्राहकांसाठी वैध आहे. वाचाः हा फुल टॉकटाइम ऑफर बीएसएमएलकडून एक जबरदस्त ऑफर केली आहे. कारण, कोणीही खासगी ऑपरेटर सध्या ग्राहकांना टॉप अप आणि फुल टॉकटाइम देत नाही. लेटेस्ट माहितीनुसार, बीएसएनएलच्या महामारीत संपूर्ण देशात आपल्या युजर्सच्या मदतीसाठी कंपनी पुढे आली आहे. वाचाः फ्री १०० कॉलिंग मिनिट आणि एक्स्ट्रा वैधता बीएसएनएलने भारतातील लोकांच्या मदतीसाठी फ्री वैधता एक्सटेंशन आणि फ्री मध्ये १०० मिनिट कॉलिंग बेनिफिट देत आहे. कंपनीच्या प्लान व्हाउचर्सची वैधता फ्रीमध्ये ३१ मे २०२१ पर्यंत वाढवली आहे. BSNL ने वादळ तौक्ते आणि कोविड १९ महामारीमुळे हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सोबत BSNL ग्राहकांना माय बीएसएनएल अॅप च्या माध्यमातून करण्यात आलेल्या सर्व रिचार्ज, टॉप अप प्लान खरेदीवर ४ टक्के अतिरिक्त सूट दिली आहे. वाचा : BSNL च्या या प्लानमध्ये मिळतोय डबल डेटा फुल टॉकटाइम शिवाय, कंपनीने नुकताच डबल डेटा ऑफर केला आहे. या प्लानची किंमत २४९ रुपये आहे. हा एक फर्स्ट रिचार्ज कूपन (FRC) आहे. गेल्या महिन्यात प्रमोशनल म्हणून या प्लानला बाजारात उतरवले होते. प्रीपेड प्लानला कंपनीने आता सर्व युजर्ससाठी उपलब्ध केले आहे. याशिवाय, यात डबल डेटा उपलब्ध केला आहे. कंपनीचा २४९ रुपयांचा प्लान त्या ग्राहकांसाठी आहे जे पहिल्यांदा रिचार्ज करणार आहेत. या प्लानध्ये ग्राहकांना रोज २ जीबी डेटा, १०० एसएमएस आणि अनलिमिटेड कॉलिंग मिळते. ग्राहकांना ६० दिवसांत एकूण १२० जीबी डेटा दिला जातो. वाचा वाचा :
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2RMPvoA