मुंबई: बिग बॉस १४ ची स्पर्धक आणि गायक यांच्यात २००६ मध्ये झालेला वाद सर्वांनाच माहीत आहे. मीका सिंहनं त्याच्या वाढदिवसाच्या पार्टीमध्ये राखी सावंतला जबरदस्ती किस केलं होतं. ज्यामुळे दोघांमध्ये प्रचंड वाद झाले होते. याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर तो खूपच अडचणीत आला होता. एवढंच नाही तर राखीनं मीका सिंगच्या विरोधात गैरवर्तनाचा गुन्हा दाखल केला होता. तर मीकाचं म्हणणं होतं की राखीनं त्याला आधी किस केलं होतं. राखी सावंत आणि मीका सिंग यांच्यातील हा वाद जुना झाला असला तरीही याचे फोटो आजही अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. पण आता हे दोघंही हा वाद विसरले असून त्यांच्यामध्ये मैत्री देखील झाली आहे. नुकत्याच व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये ही गोष्ट दिसून आली. हा व्हिडीओ सध्या इंटरनेटवर चर्चेचा विषय ठरत आहे. सेलिब्रेटी फोटोग्राफर विरल भयानी यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात मीका सिंग आणि राखी सावंत एकामेकांची गळाभेट घेताना आणि एकामेकांचं कौतुक करताना दिसत आहेत. राखीला पाहिल्यावर मीका सिंग तिला भेटण्यासाठी येतो आणि त्याला पाहिल्यावर राखी देखील 'सिंग इज किंग' असं ओरडते. त्यावर मीका तिला सांगतो की, मी इथून जात असताना तुला पाहिलं आणि मी इग्नोर करु शकलो नाही. राखी यावेळी मीकाला सांगते की, कसं सलमान खाननं तिच्या आईच्या उपचारांसाठी तिची मदत केली. त्यांच्यासाठी चांगले डॉक्टर आणि उपचारांची सोय करुन दिली. त्याच वेळी राखीनं पॅपराजींना 'आता आम्ही दोघं मित्र आहोत' असंही सांगितलं आणि मीकाच्या पाया पडली. हे पाहिल्यावर तिथले फोटोग्राफरही अवाक झाले. मौजा ही मौजा फेम गायक मीका सिंगनं यावेळी राखीचं कौतुक केलं. तो म्हणाला, 'बिग बॉस १४ जर का हिट झाला आहे तर तो फक्त आणि फक्त राखीमुळेच हिट झाला आहे.' यावेळी राखीनंही मीकाचं कौतुक केलं. करोनाच्या काळात मीका सिंग हजारो गरजू लोकांना मदत करताना दिसला आहे. राखी सावंतनं बिग बॉस १४ मध्ये वाइल्ड कार्ड एंट्री घेतली होती आणि त्यानंतर तिनं बिग बॉसचं चित्रपट पालटलं. एवढंच नाही तर तिनं शेवटच्या ५ स्पर्धकांमध्येही जागा पटकावली होती.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3vqlY2B