नवी दिल्लीः देशातील सर्वात मोठी डायरेक्ट टू होम ऑपरेटर डिश टीव्ही Dish TV आपल्या ग्राहकांना एक गुड न्यूज दिली आहे. कंपनी युजर्संना ३० दिवसांची फ्री सर्वस देत आहे. ग्राहकांनी जर लाँग टर्म प्लान घेतला तर ग्राहकांना ही सुविधा मिळणार आहे. कंपनी लाँग टर्म वैधतेचे प्लान ऑफर करीत आहे. ज्यात ३ महिने आणि त्यापेक्षा जासत ६ महिने आणि त्यापेक्षा जास्त १२ महिने किंवा त्यापेक्षा जास्त प्लानचा समावेश आहे. ग्राहकांना १ महिना फ्री सर्विस कशी मिळते, जाणून घ्या सर्व ऑफर. वाचाः कोणताही एक्स्ट्रा चार्ज नाही Dish TV ची मोठी वैधता असलेले प्लान फ्री सर्विस सोबत येतात. परंतु, यासाठी ग्राहकांना कोणतेही एक्स्ट्रा चार्ज द्यावे लागत नाही. डिश टीव्ही युजर्संना वेगवेगळ्या किंमतीचे एचडी आणि एसडी चॅनलचे मिक्स्ड पॅक ऑफर करते. यात युजर्संना कोणत्याही मोठ्या वैधतेचे प्लान रिचार्ज करू शकतात. वाचाः कशी मिळणार फ्री सर्विस रोज रिचार्जवर फ्री सर्विसची वैधता वेगवेगळी आहे. जर ग्राहक ३ महिने किंवा त्यापेक्षा जास्त रिचार्ज करीत असेल तर कंपनी ७ दिवसांची फ्री सर्विस देते. युजर्सं ६ महिने किंवा त्यापेक्षा जास्त रिचार्ज करीत असेल तर युजर्संना १५ दिवस आणि १२ महिने रिचार्ज करीत असेल तर या प्लानवर ३० दिवसांची फ्री सर्विस दिली जाते. तसेच ग्राहकांना १२ महिन्यांचा प्लान घेत असल्यास कंपनी कडून फ्री मध्ये बॉक्स स्वॅप सुविधा दिली जाते. वाचाः Dish TV रिचार्ज करण्याची पद्धत डिश टीव्हीला अनेक पद्धतीने रिचार्ज करता येऊ शकता येते. कंपनीची वेबसाइट वर जाऊन या ठिकाणी देण्यात आलेल्या Quick Recharge ऑफ्शन मध्ये जाऊन सर्व माहिती सबमिट करावी लागते. रिचार्ज करण्यासाठी तुमचा VC नंबर किंवा RMN एन्टर करावा लागतो. यानंतर तुम्हाला तुमचे चॅनेल जोडून नवीन चॅनेलसाठी अतिरिक्त पेमेंट करून पॅक कस्टमाइज करण्याची सुविधा मिळते. वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2Q6vwAA