मुंबई- आपल्या मुलाला यशस्वी होताना पाहणं प्रत्येक आई- वडिलांचं स्वप्न असतं. मुलाने चांगलं शिक्षण घ्यावं आणि योग्य ते करिअर निवडून त्यात यशस्वी व्हावं हे प्रत्येक पालकाला वाटत असतं. आपल्या मुलांना यशस्वी होताना पाहणं हे त्यांच्या आयुष्यातील सुखद क्षण असतात. असाच एक क्षण बॉलिवूड अभिनेत्री हिच्या आयुष्यात आला आहे. माधुरी आणि श्रीराम नेने यांचा मोठा मुलगा नुकताच पदवीधर झाला आहे. त्यामुळे माधुरीच्या आनंदाला पारावार उरलेला नाही. माधुरीने आपला आनंद चाहत्यांसोबत शेअर केला आहे. माधुरीने एका पाठोपाठ एक ट्वीट करत अरिनला शुभेच्छा दिल्या आहेत. कुटुंबासोबतचा फोटो शेअर करत माधुरीने लिहिलं, 'राम आणि माझ्यासाठी हा अभिमानाचा क्षण आहे, कारण आमचा मुलगा अरिनने हायस्कुलमधील शिक्षण पूर्ण करत पदवी मिळवली आहे ते देखील ग्रॅज्युएशन कॅपसह. अरिनला त्याच्या यशासाठी खूप खूप शुभेच्छा.' यासोबतच आणखी एक ट्वीट करत माधुरीने लिहिलं, 'हे संपूर्ण वर्ष तुझ्यासाठी आणि तुझ्या वर्गातील मित्रांसाठी खूप कठीण गेलं. पण अशा परिस्थितीतही अभ्यास करण्यासाठी आणि यशस्वी होण्यासाठी तुम्ही केलेल्या मेहनतीला आणि प्रयत्नांना आम्ही सलाम करतो.' आणखी एका ट्वीटमध्ये अरिनबद्दल प्रेम व्यक्त करत माधुरीने लिहिलं, 'तुझ्यात असलेल्या इच्छाशक्तीचा वापर कर. तुझ्या मनाला जे योग्य वाटतंय ते कर तुझं मन जे सांगतंय ते कर. एक दिवस तू नक्की यशस्वी होशील. तू जे काही करशील त्यात आम्ही तुझ्यासोबत आहोत. खूप खूप प्रेम.' माधुरीने अशा प्रकारे ट्वीटच्या माध्यमातून आपल्या मुलाप्रती असलेलं प्रेम व्यक्त केलं आहे. दरम्यान, माधुरी दीक्षितच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर तिने 'कलंक' चित्रपटात शेवटचं काम केलं होतं. सध्या ती डान्स दिवाने ३ या रिअॅलिटी शोची परीक्षक आहे. याशिवाय लवकरच माधुरी ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण करणार असल्याचंही बोललं जात आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3wNJerw