मुंबई: पर्यावरण रक्षणाचा संदेश देत अनेक स्टार्स खरोखरच चांगलं काम करत आहेत. या यादीत जुही हिच्या नावाचा समावेशही आहे. मोबाइल टॉवरमधून निघणाऱ्या रेडिएशन्समुळे नागरिकांच्या आरोग्यास बाधा निर्माण होते त्यामुळे गेल्या अनेक वर्षापासून रेडिएशनविरोधात ती नागरिकांमध्ये जागरुकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. देशात आता ५जी () नेटवर्क सुरू होणार असल्याच्या चर्चा असतानाच, याविरोधात जुही थेट कोर्टाचे दरवाजे ठोठावले आहेत.या विरोधात तिने मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली असून यावर आज सुनावणी होणार आहे. देशभरात 5Gचं तंत्रज्ञान वापरण्यापूर्वी यावर सखोल संशोधन होणं गरजेचं आहे. त्यानंतरच योग्य तो निर्णय घेण्यात यावा, असं जुहीनं तिच्या याचिकेत म्हटलं आहे. 5G नेटवर्कमुळे सामान्य नागरिक, तसंय पर्यावरणावर गंभिर परिणाम होऊ शकतात. या सर्व गोष्टींचा आभ्यास होणं गरजेचं आहे. त्यानंतर या संदर्भात निर्णय घेण्यात यावा, असंही जुहीनं म्हटलं आहे. यापूर्वी देखील जुहीने मोबाइल टॉवरमधून निघणाऱ्या रेडिएशन्समुळे नागरिकांच्या आरोग्यास बाधा निर्माण होत असल्याच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर,मोबाइल टॉवरमधून निघणाऱ्या रेडिएशन्सचे प्रमाण कमी करण्यासाठी सरकारने प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे, अशी मागणी जुहीने केली होती.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3uw7Nbf