मुंबई : सध्या मनोरंजनविश्वात एकाच कार्यक्रमाची सर्वाधिक चर्चा आहे; ती म्हणजे 'फ्रेंड्स-द रियुनियन’ची. हॉलिवूडमधील या टीव्ही शोचा भारतात एक खास चाहतावर्ग आहे. नव्वदच्या दशकात प्रसारित झालेल्या ‘’हा कॉमेडी शो आजही प्रेक्षकांना हसवतोय आणि त्यांचं मनोरंजन करतोय. आता ‘फ्रेंड्स-द रियुनियन’ प्रदर्शित झाला असून त्यालादेखील प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळतोय. पण, पुन्हा एकदा त्यातील सर्व कलाकारांना एकत्र आणण्यासाठी निर्मात्यांना मोजावं लागलेलं त्यांचं मानधन वाचून तुम्ही थक्क व्हाल. कलाकारांना १७ वर्षानंतर पुन्हा एकत्र आणणं सोपं नव्हतं. ‘फ्रेंड्स-द रियुनियन’च्या एका भागासाठी कलाकाराला प्रत्येकी २.५ मिलियन डॉलर इतकी रक्कम देण्यात आल्याचं कळतंय. भारतीय रुपयात हा आकडा तब्बल १८.२ कोटी रुपयांच्या वर जातो. दरम्यान ९० च्या दशकात 'फ्रेंड्स' ही टीव्ही सीरिज प्रचंड लोकप्रिय ठरली होती. २२ सप्टेंबर १९९४ मध्ये या सीरिजचा पहिला प्रीमियर झाला होता. त्यानंतर या सीरिजचे १० सीझन आले. २००४ मध्ये या सीरिजचा शेवटचा एपिसोड प्रसारित झाला. ज्याला प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर आता 'फ्रेंड्स: द रीयूनियन' पुन्हा एकदा नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3fr2GEH