नवी दिल्ली : गुगलच्या दरवर्षी होणाऱ्या इव्हेंटची प्रत्येकाला उत्सुकता असते. गेल्यावर्षी महामारीमुळे कंपनीने हा इव्हेंट रद्द केला होता. यावर्षी मात्र, गुगलने आपला Google IO २०२१ ला व्हर्च्युअली आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. हा इव्हेंट आज पासून (१८ जुले) सुरू होत असून, २० मेपर्यंत सुरू होईल. वाचाः इव्हेंटला Google I/O वेबसाइटवर ऑनलाइन पाहता येईल. यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क लागणार नाही. या इव्हेंटला कंपनीच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर देखील पाहता येईल. परंतु, या इव्हेंटचा काही भाग पाहण्यासाठी यूजर्सला अधिकृत वेबसाइटवर जाऊन आधी नोंदणी करावी लागेल. गुगल या इव्हेंटमध्ये सोबत अनेक दमदार प्रोडक्ट्स लाँच करण्याची शक्यता आहे. हे प्रोडक्ट्स होऊ शकतात लाँच गुगलच्या या इव्हेंटमध्ये सर्वात आधी कंपनीचे सीईओ सुंदर पिचाई यांचे भाषण असेल. या इव्हेंटमध्ये Google Pixel 5a स्मार्टफोनला लाँच केले जाऊ शकते. सोबतच Google Pixel 4a स्मार्टफोनचे अपग्रेडेट व्हर्जन सादर केले जाऊ शकते. याशिवाय Pixel Watch आणि Pixel Buds चे स्वस्त व्हर्जन Pixel Buds A देखील लाँच केले जाऊ शकते. वाचाः नवीन लाँच होणार लीक रिपोर्टनुसार, गुगलकडून एक सर्कुलर वॉच सादर केली जाऊ शकते. हे वॉच WearOS च्या नवीन व्हर्जनवर आधारित असेल. ही एक बेजेललेस वॉच असेल, ज्यात कोणतेही फिजिकल बटन नसेल. आणि च्या वॉचप्रमाणे यात देखील हर्ट रेट सेंसर मिळेल. वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3tXe1Ao