नवी दिल्ली : फोटो-व्हीडिओ सेव्ह करण्यासाठी गुगल फोटोजचा वापर करणाऱ्या यूजर्सला कंपनीने आता मोठा झटका दिला आहे. कंपनीने आता आपल्या नियमात बदल केला असून, १ जून पासून यूजर्सला मध्ये फोटो-व्हीडिओ स्टोर करण्यासाठी केवळ १५जीबी फ्री मिळणार आहे. आतापर्यंत कंपनी अमर्यादित फ्री स्टोरेज देत असे. या डिव्हाइसला लागू नसेल नियम XDA Developers ने च्या रिपोर्टनुसार 2 आणि त्याच्या वरील Pixel डिव्हाइस वापरणाऱ्यांसाठी हा नियम लागू नसेल. वाचाः एडिशनल स्टोरेजसाठी स्बस्क्रिप्शन पिक्सल यूजर्सला गुगल फोटोजवर अनलिमिटेड हाय क्वालिटी फोटो बॅकअपची सुविधा मिळत राहणार आहे. मात्र ज्यांच्याकडे पिक्सल फोन नाही, त्यांना सबस्क्रिप्शन घ्यावे लागेल. या स्बस्क्रिप्शनमध्ये १०० जीबीसाठी १९.९९ डॉलर्स मोजावे लागतील. नोव्हेंबर २०२० मध्येच केली होती घोषणा कंपनीने गेल्यावर्षी २०२० मध्येच याबाबत घोषणा केली होती. कंपनीने सांगितले होते की, वर फ्री स्टोरजला १५जीबी पर्यंत मर्यादित केले जाणार आहे. अतिरिक्त स्टोरेज हवे असल्यास यूजर्सला गुगल वनचे स्बस्क्रिप्शन घ्यावे लागेल. रिपोर्टनुसार, निश्चित तारखेच्या आधी गुगल फोटोज वर अपलोड केलेल्या व्हीडिओ आणि फोटोला १५जीबी स्टोरेजची मर्यादा लागू नसेल. त्यामुळे यूजर्सने आधीच फोटो आणि व्हीडिओ स्वरुपात असलेल्या आठवणींना अपलोड करायला हवे आणि सबस्क्रिप्शन घेणे टाळले पाहिजे. वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3tyDvnA